Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Dhurandhar 2’मुळे अक्षय कुमाने बदलली ‘Bhooth Bangla’ची रिलीज डेट? अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

अभिनेता अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अक्षय कुमारची एक नवीन मुलाखत समोर आली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने 'धुरंधर २' या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2026 | 12:11 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘Bhooth Bangla’ची ढकलली पुढे?
  • अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण
  • ‘Dhurandhar 2’मुळे निर्मात्यांचा निर्णय?
 

प्रसिद्ध बॉलीवूड स्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल सतत नवीन माहिती समोर येत आहे. नुकताच ‘भूत बंगला’चा एक जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते ‘भूत बंगला’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान, अभिनेता अक्षय कुमारची एक मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमारने ‘धुरंधर २’ आणि स्वतःच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने दोन्ही चित्रपटामध्ये होणाऱ्या टक्करबाबत आपले मत मांडले आहे.

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती

‘धुरंधर २’ चा ‘भूत बंगला’वर होणार परिणाम

‘धुरंधर २’ च्या भोवती निर्माण झालेल्या वादळाचा त्याच्या आगामी चित्रपट ‘भूत बंगला’वर परिणाम होईल का, असा प्रश्न अभिनेता अक्षय कुमारला IANS सोबतच्या एका मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला, “‘धुरंधर’ इतकी चांगली कामगिरी करत असल्याचा मला खूप आनंद आहे. या चित्रपटाने भारतीय चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेले आहे, ही खूप उत्साहवर्धक गोष्ट आहे. साधारणपणे तीन आठवडे पुरेसे असतात, पण इथे आपण २१ दिवसांबद्दल बोलत आहोत… ही इंडस्ट्रीसाठी एक चांगली गोष्ट आहे आणि यामुळे तुम्हाला अधिक मुलाखती देण्याची संधीही मिळते. जर चित्रपट चालले नाहीत, तर अशा संवादांसाठी व्यासपीठच उपलब्ध राहणार नाही.”

सध्याच्या ॲक्शन चित्रपटांना उत्तर म्हणून हा चित्रपट बनवण्याबद्दल विचारले असता, अक्षयने स्पष्ट केले की त्याच्या टीमने कोणताही ट्रेंड फॉलो केला नाही. त्यांचे संपूर्ण लक्ष कथेच्या ताकदीवर होते. त्याने स्पष्ट केले की ‘धुरंधर’ प्रामुख्याने प्रौढ प्रेक्षकांसाठी आहे, तर ‘भूत बंगला’ मुलांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तो म्हणाला, “तो चित्रपट वास्तववादावर आधारित आहे, तो ॲक्शन आहे आणि प्रौढांसाठी आहे; हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. आमचे सर्व चित्रपट यशस्वी होणे ही आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि चित्रपटसृष्टीसाठीही हे चांगले आहे.”

Dhurandhar 2 च्या सीनवरून वाद; आर. माधवनवर गुरबाणीचा अपमान केल्याचा आरोप, शिवसेना नेत्याने केली माफीची मागणी

‘भूत बंगला’ कधी होणार प्रदर्शित?

‘धुरंधर २’ च्या लोकप्रियतेमुळे हा चित्रपट पूर्वी पुढे ढकलण्यात आला होता. ‘भूत बंगला’ २ एप्रिलवरून पुढे ढकलण्यात आला. नंतर, जेव्हा असे लक्षात आले की सलमान खान त्याचा ‘मातृभूमी’ एप्रिलमध्ये प्रदर्शित करणार नाही, तेव्हा अक्षय कुमारने १० एप्रिलची तारीख निवडली. अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट, ‘भूत बंगला’, आता येत्या १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अक्षय कुमारचा हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

Web Title: Bhooth bangla will dhurandhar 2 affect akshay kumars film the actor said thats an adult film but ours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Dhurandhar 2 च्या सीनवरून वाद; आर. माधवनवर गुरबाणीचा अपमान केल्याचा आरोप, शिवसेना नेत्याने केली माफीची मागणी
1

Dhurandhar 2 च्या सीनवरून वाद; आर. माधवनवर गुरबाणीचा अपमान केल्याचा आरोप, शिवसेना नेत्याने केली माफीची मागणी

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती
2

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती

Dhurandhar 2: रजनीकांत यांचे कौतुक ऐकून भावूक झाला Aditya Dhar; पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या मनातील भावना
3

Dhurandhar 2: रजनीकांत यांचे कौतुक ऐकून भावूक झाला Aditya Dhar; पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या मनातील भावना

BO Collection: Dhurandhar 2 ने अवघ्या पाच दिवसात गाठला ५०० कोटींचा टप्पा; जाणून घ्या एकूण कलेक्शन
4

BO Collection: Dhurandhar 2 ने अवघ्या पाच दिवसात गाठला ५०० कोटींचा टप्पा; जाणून घ्या एकूण कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.