विकी कौशलच्या 'छावा'ला नंबर १ होण्यासाठी 'या' दोन चित्रपटांचं चॅलेंज, धुलिवंदनाला केली सर्वाधिक कमाई
मॅडॉक फिल्म्ससाठी या वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. आधी ‘स्काय फोर्स’ने १०० कोटी रुपये कमावले आणि आता ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विकी कौशल अभिनीत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात किती कलेक्शन केले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आणि याचीच झलक बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २०० कोटींचा गल्ला पार केले आहे.
Drishyam 3: ‘भूतकाळ कधीच शांत नसतो’, मोहनलालने खास अंदाजात केली ‘दृश्यम ३’ ची घोषणा!
‘छावा’ बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे
लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर उत्तम कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या प्रचंड कमाईनंतर, हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. तसेच, विकी कौशलच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट आहे.
पहिल्या आठवड्यात ‘छावा’ने केली एवढी कमाई
‘छावा’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने पहिल्या सहा दिवसांत १९७.७५ कोटी रुपये कमावले आहेत. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने सातव्या दिवशी १७.६१ कोटी रुपये कमावले आहेत. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २१५.३६ कोटी रुपये झाले आहे. तसेच प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
१३ वर्षांच्या डेटिंगनंतर प्राजक्ता कोळी करणार लग्न; या दिवशी बांधणार प्रियकरासोबत रेशीमगाठ!
जर आपण सर्वाधिक कमाई करणाऱ्या युद्धकालीन नाट्यमय हिंदी चित्रपटांबद्दल बोललो तर ‘पद्मावत’ पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ आहे. ‘छावा’ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.