(फोटो सौजन्य - x अकाउंट)
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल लवकरच दृश्यम फ्रँचायझीच्या पुढील भागात दिसणार आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. गुरुवारी २० फेब्रुवारीला अभिनेत्याने ‘दृश्यम ३’ मध्ये चित्रपट निर्माते जीतू जोसेफसोबत काम करणार असल्याची पुष्टी केली आहे. आणि या बातमीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने आता वाट पाहत आहेत.
मोहनलालने ‘दृश्यम ३’ ची पुष्टी केली
मोहनलालने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून लिहिले, “भूतकाळ कधीही शांत नसतो. दृश्यम ३ कन्फर्म.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या घोषणेनंतर चाहत्यांचा उत्साह खूप वाढला आहे. लोक सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “क्लासिक क्रिमिनल परत येत आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “या चित्रपटाची वाट पाहत आहोत” याशिवाय इतर वापरकर्तेही कमेंट्सद्वारे त्यांच्या भावना व्यक्त करत आपले मत मांडले आहे.
India Got Latent: समय रैनाच्या अडचणी वाढल्या, महाराष्ट्र सायबर सेलने कॉमेडियनला पाठवले दुसरे समन्स!
हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता.
‘दृश्यम’ हा चित्रपट जॉर्जकुट्टी (मोहनलाल) आणि त्याच्या कुटुंबाची संघर्षाची कहाणी सांगतो. चित्रपटात, जेव्हा पोलिस महानिरीक्षकांच्या मुलाची हत्या होते तेव्हा तो संशयाच्या भोवऱ्यात येतो. आशीर्वाद सिनेमाजच्या बॅनरखाली अँटनी पेरुम्बवूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०१३ मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला होता.
The Past Never Stays Silent
Drishyam 3 Confirmed!#Drishyam3 pic.twitter.com/xZ8R7N82un
— Mohanlal (@Mohanlal) February 20, 2025
चित्रपटाtollywoodचा सिक्वेल २०२२ मध्ये प्रदर्शित झाला
चित्रपटाचे यश पाहून ‘दृश्यम’चा सिक्वेल ‘दृश्यम २’ २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला. ‘दृश्यम’ च्या प्रचंड यशानंतर आणि कौतुकानंतर, आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, चिनी आणि सिंहली भाषांचा समावेश आहे.
Sachet Parampara Son: सचेत आणि परंपरा टंडन यांच्या गोंडस मुलाचे नाव जाहीर; काय आहे या नावाचा अर्थ?
हा चित्रपट हिंदीमध्ये प्रचंड हिट झाला होता
अजय देवगण दृश्यम फ्रँचायझीच्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसला होता. हिंदी आवृत्ती बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरली. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर ₹२३९.६७ कोटींची कमाई केली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आणि त्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद देखील मिळाला.