(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा ७० -८०च्या दशकात यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा होत्या. आजही त्यांची लव्ह स्टोरी चर्चेचा विषय ठरते. १९७० च्या दशकात अमिताभ आणि रेखा यांचं नाव एकत्र जोडलं गेलं, त्यांच्या सिलसिला या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. आजही हे नातं बॉलिवूडमधील सर्वाच चर्चित आणि रहस्यमय नात्यांपैकी एक मानले जाते. त्या काळात अमिताभ आणि रेखा यांच्यात प्रचंड जिव्हाळ्याचे नाते होते.
अलीकडेच त्यांच्या या नात्याबद्दल काही नवे खुलासे समोर आले आहेत.आजही हे नक्की काय प्रकरण होतं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना तेवढीच उत्सुकता आहे. अशातच ज्येष्ठ सिने-पत्रकार पूजा सामंत यांनी दिलेल्या मुलाखतीत यांच्या प्रेमकथेवरील काही खास सांगितल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासाठी रेखा यांनी नॉन-व्हेज सोडून दिले होते. अमिताभ पूर्णपणे शाकाहारी असल्याने त्यांना इम्प्रेस करण्यासाठी रेखा या शूटिंगदरम्यान सेटवर नॉनवेज खात नव्हत्या, त्यांनी शाकाहार स्वीकारल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
Ekta kapoor Naagin 7 | नागिनच्या सातव्या सीझनसाठी ‘या’ अभिनेत्रीचे नाव कन्फर्म?
अमिताभ यांच्यासाठी रेखा यांनी शाकाहारी होणं पसंत केलं होतं. दुसरीकडे रेखा यांनी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नात सिंदूर लावून उपस्थित राहिल्याने मोठा गोंधळ झाला होता. नवरा नवरीला सोडून सर्व कॅमेरे रेखा यांच्याकडे वळले होते. याविषयी सांगताना सामंत म्हणाल्या, ‘रेखा त्या वेळी विवाहित नव्हत्या. तरीही त्या विवाहित स्त्रीप्रमाणे लग्नात आल्या होत्या. त्यामुळे उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांचे लक्ष रेखाकडेच केंद्रित झाले.
शेवटी पूजा सामंत म्हणाल्या,अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात हळूहळू जवळीक वाढली होती. मात्र काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.” मीडिया रिपोर्टनुसार, १९८१ मध्ये रिलीज झालेला ‘सिलसिला’ हा चित्रपट अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा शेवटचा ठरला.
अमिताभ बच्चन आणि रेखाच्या प्रेमकथेची सुरुवात
अमिताभ बच्चन आणि रेखाची प्रेमकथा १९७० च्या दशकात ‘दो अंजाने’ सारख्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या प्रेमसंबंधाच्या अफवांना वेग आला, रेखा यांनी कधीकधी प्रेम कबूल केले, तर अमिताभ यांनी नेहमी नाकारले.