Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देव आनंद यांचे चिरंजीव सुनील आनंद यांना देवाज्ञा! जिथे वडिलांनी प्राण सोडले, तिथेच प्राणज्योत माळवली

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते Dev Anand यांचे पुत्र आणि अभिनेते Sunil Anand यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. २०११ मध्ये देव आनंद यांचेही याच रुग्णालयात निधन झाले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 28, 2026 | 04:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला असून, बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
  • अनिता पद्दा यांनी सुनील आनंद यांच्या आयुष्यावर A Convergence of Solitudes हे पुस्तकही लिहिले आहे.
  • अभिनय कारकीर्द अपेक्षेप्रमाणे गाजली नसली तरी त्यांनी चित्रपटसृष्टीशी आपले नाते कायम ठेवले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते Dev Anand यांचे पुत्र आणि अभिनेते Sunil Anand यांचे सोमवारी सकाळी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे, २०११ मध्ये याच लंडनमधील रुग्णालयात देव आनंद यांनीही अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे आनंद कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला असून, बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

Richa Chadha : जेष्ठ नागरिकांसाठी बरळले वंगाळ! अभिनेत्री म्हणते ‘… त्यांचा सम्मान करू नका!’ नेटकऱ्यांच्या संताप शिघेला

सुनील आनंद यांच्या निधनाच्या वृत्ताला प्रसिद्ध लेखिका Anita Padda यांनी दुजोरा दिला. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने सुनील यांचे निधन झाले. देव आनंद यांच्या निधनानंतर ते लंडनमध्ये स्थायिक झाले होते. अनिता पद्दा यांनी सुनील आनंद यांच्या आयुष्यावर A Convergence of Solitudes हे पुस्तकही लिहिले आहे.

सुनील आनंद यांनी अमेरिकेतील अमेरिकन युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन डीसी येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या आनंद और आनंद या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत राखी, स्मिता पाटील आणि बिस्वजीत चॅटर्जी यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते. मात्र, चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही.

यानंतर सुनील आनंद यांनी कार थीफ, मैं तेरे लिए आणि मास्टर यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या. तरीही त्यांना वडील देव आनंद यांच्यासारखी लोकप्रियता आणि व्यावसायिक यश मिळवता आले नाही. अभिनय कारकीर्द अपेक्षेप्रमाणे गाजली नसली तरी त्यांनी चित्रपटसृष्टीशी आपले नाते कायम ठेवले.

Love And War Update: भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत सर्वात मोठी अपडेट समोर! रणबीर-आलियाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

२०११ मध्ये देव आनंद यांच्या निधनानंतर सुनील आनंद यांनी त्यांच्या ‘नवकेतन फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी स्वीकारली. आपल्या वडिलांचा वारसा जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने आणखी एका व्यक्तिमत्त्वाला गमावले असून, चाहते आणि सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Web Title: Dev anands son suneil anand passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Death
  • Dev Anand

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.