
Wardha Murder Case: "काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला..." इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!
मिळालेल्या माहितीनुसार, मृत गजानन पाटणकर आणि आरोपी युवकांमध्ये मागील आठवड्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद सुरू होता. रविवारी घटनेच्या अवघ्या काही तास आधीही दोन्ही बाजूंमध्ये जोरदार खटके उडाले होते. या वादाची साकळी इथेच थांबली नाही. काही वेळानंतर गजानन पाटणकर हा पुन्हा आरोपी युवकांच्या इंदिरानगर परिसरात पोहोचला. तेथे दोघांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात असलेल्या चार ते पाच युवकांनी पाटणकर याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. आरोपींनी त्याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कापडे यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून अवघ्या काही तासांत हत्येप्रकरणी चार ते पाच संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे. या हत्येमागील नेमके कारण काय होते, पूर्ववैमनस्य कशावरून होते आणि हल्ल्यात नक्की कोणी कोणी सहभाग घेतला होता, या सर्व बाबींचा अधिक सखोल तपास देवळी पोलीस करत आहेत.
Ans: ही घटना वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील इंदिरानगर परिसरात घडली असून, गजानन पाटणकर असे मृत कुख्यात दारू विक्रेत्याचे नाव आहे.
Ans: गजानन पाटणकर आणि आरोपी युवकांमध्ये मागील आठवड्यापासून सुरू असलेला वाद आणि घटनेच्या काही तासांपूर्वी झालेली भांडणाची ठिणगी या हत्येला कारणीभूत ठरली.
Ans: देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कापडे यांनी तातडीने तपास करत ४ ते ५ संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे.