
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यजीने नुकत्याच तिच्या स्वप्नातील घराचा गृहप्रवेश करून चाहत्यांना त्याची झलक दाखवली आहे. या आनंददायी प्रसंगी तिच्यासोबत तिचा नवरा शाहनवाज शेख आणि मुलगा जॉय देखील दिसला आहे. देवोलीनाने सोशल मीडियावर पूजेचे फोटो शेअर केले आहेत, जे वेगाने व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये देवोलीनाने डोक्यावर सजवलेला कलश घेऊन चालताना दिसत आहे, तर शाहनवाज एका हातात मुलगा जॉय आणि दुसऱ्या हातात पूजेची थाळी घेऊन उभा असलेला दिसत आहे. अभिनेत्रीच्या नव्या घराचे हे फोटो चर्चेत आले आहेत, चाहते त्यावर कंमेंट करून चांगला प्रतिसाद देत आहेत.
सोशल मीडियावर फोटो शेअर करताना देवोलीना भट्टाचार्यजीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी वेळ, धैर्य आणि खूप विश्वास लागतो. आज माझ्या स्वप्नातील घरात उभी राहून मला या सर्व प्रकारच्या भावना जाणवतात. प्रवास, धडे आणि आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेल्या आशीर्वादांबद्दल मी आभारी आहे. आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ” पवित्रा पुनियासह अनेक सेलिब्रिटींनी देवोलीनाने शेअर केलेल्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या. चाहतेही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका व्यक्तीने लिहिले, “गोपी बहू, शुभेच्छा.” दुसऱ्या युझरने लिहिले, “ही मूल्ये आहेत. कोणत्याही धर्मात लग्न केले, पण कधीही आपला धर्म विसरला नाही. पण दीपिका कक्कर स्वतःचा धर्म विसरली.”
देवोलीनाने दाखवली नव्या घराची झलक
देवोलीनाने तिचा पती, मुलगा आणि पाळीव कुत्र्यासोबतच्या गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये देवोलीना होमहवन करताना दिसली आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती स्वयंपाकघरात पूजा करताना दिसली आहे. तर तिचा पती आरती करताना दिसला आहे. एका फोटोमध्ये देवोलीनाने डोक्यावर कलश घेऊन घरात प्रवेश केला. तर तिच्या पतीने हातात देवाची मूर्ती पकडल्याने सर्वांना आश्चर्यचकित वाटले आहे. सगळे आता त्याचे सोशल मीडियाद्वारे कौतुक करत आहेत.
‘Dhurandhar’ ने दोन दिवसात घातला धुमाकूळ; चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील, केला नवा रेकॉर्ड
देवोलीनाने जेव्हा शहनवाजशी लग्न केले तेव्हा तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलेले कारण तो मुस्लिम धर्माचा आहे. पण शहवाज ज्याप्रकारे हिंदू धर्माचा आदर करतो, गणपतीला स्वत: मूर्ती घेऊन येतो हे पाहून देवोलीनाचे चाहतेही भारावून गेले आहेत. तसेच या दोघांचे चाहते आता भरभरून कौतुक करत आहेत. आणि या जोडप्यांचा आदर करत आहेत.