(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी सक्षम ताटे याची आंतरजातीय प्रेम प्रकरणी हत्या करण्यात आली. आणि याचीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली, या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली. वडील आणि भावानं हत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेहाशी तरुणीनं ‘लग्न’ केल्यानंतर या प्रकरणाची जास्त चर्चा सुरु झाली. या प्रकरणी संपूर्ण माहिती तरुणीने पोलिसांना दिली. आता या संपूर्ण प्रकरणी बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने या प्रकरणासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आली आहे. अभिनेता नक्की काय म्हणाला आहे जाणून घेऊयात.
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत असलेला ‘धडक २’ हा चित्रपट देखील अशाच कथानकावर बेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा हा सिनेमा प्रदर्शित झाला. एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्याला या चित्रपटासाठी पुरस्कार देखील मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर सिद्धांतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा पुरस्कार सक्षम ताटे या तरुणासा समर्पित केल्याचे आता त्याने म्हटले आहे. अभिनेत्याच्या या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
नेमकं काय म्हणाला अभिनेता?
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सिद्धांत म्हणाला की, हा पुरस्कार फक्त माझा नाहीए. ज्यांना जातीय व्यवस्थेत अपमान सहन करावा लागला, भेदभाव सहन करावा लागला, ज्यांना बहिष्कृत करण्यात आलं होतं, हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे. ज्यांनी अस्तित्वासाठी सोसलं, ज्यांनी स्वत: चे अधिकार मिळवले, त्यांना हा पुरस्कार समर्पित आहे. माझा हा पुरस्कार दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो. मी त्याच्या कुटुंबासोबत, त्याच्या गावकऱ्यांसोबत उभा आहे, असे म्हणून सिद्धांतने थेट आपले मत मांडले आहे.
‘अटल करंडक’ तीन दिवसांची नाट्य स्पर्धा! विजेत्यांना मिळणार १ लाखांची रोख रक्कम
काय आहे नेमकं प्रकरण?
नांदेडच्या इतवारा परिसरात काही दिवसापूर्वी प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सक्षम ताटे याचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशी आणि दगडाने मारुन सक्षम ताटे याची हत्या केली. सक्षम ताटे आणि मामीडवार कुटुंबीय हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सक्षम ताटे काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गजानन मामीडवार यांनी सक्षमला त्यांच्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, सक्षम आणि आचल यांचे प्रेमप्रकरण सुरु राहिलेया मामीडकर कुटुंबीयांनी गुरुवारी त्याला संपवले होते. या घटनेनंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आले आहे.






