Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2: भारतात ब्लॉकबस्टर, जपानमध्ये फुस्स! रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ला पहिल्याच दिवशी अवघे 900 प्रेक्षक

Dhurandhar 2: रणवीर सिंहच्या 'धुरंधर २'ने भारतात विक्रमी कमाई केली असली तरी जपानमध्ये चित्रपटाला निराशाजनक प्रतिसाद मिळाला. 80 स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी अवघे 900 प्रेक्षक मिळाले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 02:35 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Dhurandhar 2: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ फ्रँचायझीने भारतीय आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं आहे. या फ्रँचायझीतील दोन्ही चित्रपटांनी मिळून जगभरात ३१०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, भारतात विक्रमी यश मिळवल्यानंतर १० जुलै रोजी जपानमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर २’ला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

जपानमध्ये सुमारे ८० स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या या बिग-बजेट अॅक्शन चित्रपटाला पहिल्याच दिवशी अवघे ९०० प्रेक्षक मिळाले. प्रदर्शनाच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत ५७ ठिकाणी केवळ ४४९ तिकिटांची विक्री झाली होती. दिवसअखेर ही संख्या सुमारे ९०० तिकिटांपर्यंत पोहोचली. त्यामुळे चित्रपटाला जपानमधील आठवड्याच्या अखेरीस सर्वाधिक प्रेक्षक मिळवणाऱ्या टॉप २५ चित्रपटांमध्येही स्थान मिळवता आलं नाही.

विशेष म्हणजे, प्रदर्शना आधी मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार करूनही ‘धुरंधर २’ जपानी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात अपयशी ठरला. परिणामी, जपानमध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या टॉप १० यादीतही या चित्रपटाला स्थान मिळालेलं नाही. या यादीत ‘आरआरआर’ हा चित्रपट ८,२३० प्रेक्षकांसह अव्वल स्थानावर असून, त्यानंतर ‘साहो’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘पठाण’, ‘सालार’, ‘जवान’, ‘रंगस्थलम’, ‘देवरा’, ‘बाहुबली २’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Kamali : ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! सरोजचं पात्र संपणार? गोळी लागण्याच्या सीननंतर योगिनी चौकने सांगितली मनातील भीती

दुसरीकडे, भारतीय बॉक्स ऑफिसवर मात्र ‘धुरंधर २’ने दमदार कामगिरी केली आहे. हा चित्रपट आमिर खानच्या ‘दंगल’नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरल्याचं सांगितलं जात आहे. डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’चा पहिला भागही सुपरहिट ठरला होता. दोन्ही चित्रपटांनी मिळून ३१०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यापैकी ‘धुरंधर २’ने एकट्यानेच १०० दिवसांत १८१३ कोटी रुपयांचा जागतिक गल्ला जमवल्याचं समोर आलं आहे.

आदित्य धर दिग्दर्शित या फ्रँचायझीत रणवीर सिंहसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा आणि दानिश पंडोर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. भारतात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाला जपानमध्ये मात्र अत्यंत थंड प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटसृष्टीत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

केवळ भाषांतर नाही तर…; १४ भाषांमध्ये डब होणारी Heeramandi ठरली पहिली भारतीय सिरीज! ४३ देशांमध्ये ‘टॉप १०’ मध्ये स्थान

Web Title: Dhurandhar 2 a blockbuster in india but a flop in japan ranveer singhs film draws just 900 viewers on opening day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • bollywood Flim
  • Japan
  • ranvir singh

संबंधित बातम्या

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!
1

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.