Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravina Tandan : 6 वर्षांच्या ओळखीला दिला डच्चू! घरच्या मोलकरणीने अभिनेत्रीच्या आईचे दागिने केले लंपास

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन यांच्या कुटुंबाशी संबंधित धक्कादायक चोरीचे प्रकरण समोर आले आहे. सहा वर्षांपासून कुटुंबाच्या विश्वासात राहिलेल्या एका महिलेवर 25 लाख रुपयांचे सोन्या-हिऱ्यांचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरी केल्याचा आरोप असून तिला अटक करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 02, 2026 | 07:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • टंडन कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
  • घरात मुक्तपणे वावरण्याची परवानगी देण्यात आली होती.
  • आरोपीच्या इतर साथीदारांचा सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन यांच्या कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक चोरीचे प्रकरण समोर आले आहे. गेली सहा वर्षे कुटुंबाच्या विश्वासात राहिलेल्या एका महिलेवर तब्बल 25 लाख रुपयांचे सोन्या-हिऱ्यांचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरी केल्याचा आरोप असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे टंडन कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

‘मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!’ Star Pravah वर नव्या मालिकांचा बहर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा अंत

राशी छाब्रिया (वय 47) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. ती रविना टंडन यांच्या आई वीणा टंडन यांची केअरटेकर म्हणून काम करत होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, राशी 2020 पासून त्यांच्या संपर्कात होती. वैयक्तिक अडचणींनंतर ती कुटुंबाच्या अधिक जवळ आली आणि कालांतराने तिने सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तिला घरात मुक्तपणे वावरण्याची परवानगी देण्यात आली होती.

ऑक्टोबर 2025 मध्ये कुटुंबीयांनी घरातील तिजोरीची तपासणी केली असता ती उघडलेली आढळली. त्यामधील सोन्या-हिऱ्यांचे दागिने तसेच दोन महागडी मनगटी घड्याळे गायब असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी संशय आल्यानंतर कुटुंबीयांनी चौकशी सुरू केली. तक्रारदार राजीव टंडन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला राशी छाब्रियाने सर्व आरोप फेटाळले. मात्र पुढील चौकशीदरम्यान तिने चोरीची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने चोरीतील दोन घड्याळे परत केली आहेत. मात्र दागिने तिने जगदीश नावाच्या एका परिचिताकडे दिल्याचे सांगितले. दागिने परत मिळवून देण्याचे आश्वासनही तिने कुटुंबीयांना दिले होते. तथापि, अद्याप सर्व दागिने हस्तगत झाले नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. राजीव टंडन यांनी आरोप केला आहे की, आरोपी महिलेच्या एका साथीदाराने स्वतःला पोलिसांचा माहितीदार असल्याचे सांगत त्यांना धमकावले. दागिने परत मागण्याचा आग्रह धरल्यास खोट्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अरेंज मॅरेजनंतर आईचं निधन, मराठी अभिनेत्रीची डॉक्टर पतीसाठी भावूक पोस्ट;म्हणाली…

जुहू पोलिसांनी 21 मे रोजी राशी छाब्रियाला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली होती. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून चोरी गेलेल्या दागिन्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आरोपीच्या इतर साथीदारांचा सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Domestic help makes off with ravina tandans mothers jewelry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 07:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.