Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साई पल्लवी-जुनैद खानच्या ‘एक दिन’ची खास गोष्ट; निर्माता म्हणून मन्सूर खानने साकारली अनोखी भूमिका

साई पल्लवी-जुनैद खान या दोघांचा ‘एक दिन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच या चित्रपटाबद्दल मन्सूर खान यांनी आपले मत मांडले आहे. ते याबद्दल काय म्हणाले जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 09, 2026 | 11:26 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • साई पल्लवी-जुनैद खानच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
  • निर्माता म्हणून मन्सूर खानने साकारली अनोखी भूमिका
  • मन्सूर खानने सांगितला अनुभव
 

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या आगामी ‘एक दिन’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हृदयाला भिडणारी आणि भावनिक प्रेमकथा सादर करणाऱ्या या चित्रपटाने आपली झलक आणि सुरेल गाण्यांमुळे आधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि मन्सूर खान ही लोकप्रिय जोडी दीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र आली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या चित्रपटाची धडाकेबाज कामगिरी; चित्रपटाने गाठला कोटींचा टप्पा

‘एक दिन’मध्ये निर्माता म्हणून काम करताना मन्सूर खान यांनी आपली भूमिका वेगळ्या पद्धतीने पार पाडल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “चित्रपटात दिग्दर्शक एकच असतो, त्यामुळे मी स्वतःला एका ‘निगराणी’ करणाऱ्या व्यक्तीसारखं समजत होतो. दिग्दर्शक अब्बास टायरवाला यांना मी सतत अभिप्राय देत होतो आणि त्यांनीही त्याचे मनापासून स्वागत केले. माझ्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे. मला प्रेरणा देणारे विषय आणि व्यक्तिरेखा निवडणं मी प्राधान्याने केलं. ‘एक दिन’ हा क्षणिक विस्मरणाच्या आजारासारख्या संवेदनशील विषयाला स्पर्श करणारा चित्रपट आहे. कथालेखन अंतिम करण्यापासून चित्रीकरण, संपादन आणि ध्वनीपर्यंत माझा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.”

दीर्घ काळानंतर आमिर खान आणि मन्सूर खान पुन्हा एकत्र येत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय सर्जनशील जोडी पुन्हा सक्रिय झाली आहे. ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जाने तू… या जाने ना’ यांसारखे अविस्मरणीय चित्रपट देणाऱ्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. आता ‘एक दिन’च्या माध्यमातून ते पुन्हा एकदा रोमँटिक जॉनरमध्ये परतत आहेत, त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

‘बॉलीवूडमध्ये खरं काम करणं…’ होस्टिंगच्या प्रचंड ट्रोलिंगनंतर आलियाला मिळाली सोना मोहापात्राची साथ; ट्रोलर्सना दिलं प्रत्युत्तर

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘एक दिन’मध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या ताज्या जोडीमुळे चित्रपटाला नवं आकर्षण लाभलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून, निर्मिती आमिर खान, मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. एकूणच, भावनिक कथा, दमदार टीम आणि लोकप्रिय जोडीचे पुनरागमन यामुळे ‘एक दिन’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, तो प्रेक्षकांच्या मनावर कोणती छाप पाडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ek din movie update mansoor khan on production role sai pallavi junaid khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट
1

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!
2

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
3

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा
4

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.