Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prabhakar Karekar: लोकप्रिय गायक प्रभाकर कारेकर यांचे निधन, वयाच्या ८० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

भारतीय शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८० वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. तसेच या बातमीने संपूर्ण भारतीय संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2025 | 12:00 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे मुंबईत निधन झाले आहे. अल्पशा आजारानंतर त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यात जन्मलेले प्रभाकर कारेकर यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी बुधवारी रात्री शिवाजी पार्क परिसरातील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पंडित प्रभाकर कारेकर यांचे पार्थिव आज दादर येथील त्यांच्या निवासस्थानी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर, आज सायंकाळी ५ वाजता दादर स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. या बातमीने त्याच्या चाहत्यांना दुःख झाले आहेत. तसेच चाहत्यांसह त्यांच्या कुटुंबात आणि संपूर्ण संगीत विश्वास शोककळा पसरली आहे.

माजी सैनिकांकडून घेतले प्रशिक्षण
कारेकर हे “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल” आणि “वक्रतुंड महाकाय” सारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. एक उत्कृष्ट गायक आणि शिक्षक म्हणून आदरणीय असलेले कारेकर यांनी ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) आणि दूरदर्शनवर श्रेणीबद्ध कलाकार म्हणून सादरीकरण केले. त्यांनी पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सीआर व्यास यांसारख्या दिग्गजांकडून प्रशिक्षण घेतले.

‘जगरनॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध रॅपर केली आत्महत्या, वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

या पुरस्कारांनी सन्मानित केले
त्यांना तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि गोमंत विभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहे. कारेकर यांनी ऑर्नेट कोलमन आणि सुलतान खान यांच्यासोबत फ्यूजन संगीतातही काम करून चांगला अनुभव अनुभवला आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे, ‘भारतीय शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. गोव्यातील अंतरुज पॅलेसमध्ये जन्मलेल्या त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.’ असे त्यांनी लिहिले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Saddened to learn about the demise of Hindustani Classical & Semi Classical vocalist Pandit Prabhakar Karekar.

Born in Antruz Mahal Goa, learnt the Hindustani Classical Music under the tutelage of Pandit Jitendra Abhisheki. Performed at various platforms all over the globe. He… pic.twitter.com/28olOtmuCx

— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) February 13, 2025

रणवीर इलाहाबादियाचे स्वप्न राहिले अपूर्ण, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरने केले अनफॉलो? युजर्सने दिले पुरावे!

म्हणाले- वारसा चालू राहील
मुख्यमंत्र्यांनी पुढे लिहिले की, ‘त्यांनी जगभरातील विविध व्यासपीठांवर सादरीकरण केले आहे. गोव्यात शास्त्रीय संगीताचे जतन आणि विस्तार करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचा संगीताचा वारसा त्यांच्या शिष्यांसह आणि चाहत्यांसह चालू राहील. कुटुंब, चाहते, हितचिंतक आणि विद्यार्थ्यांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती’.’ असे त्यांनी लिहिले.

Web Title: Famous hindustani vocalist pandit prabhakar karekar passes away in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Classical Music
  • Indian classical singer

संबंधित बातम्या

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!
1

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News
2

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News

खांद्यावर तोफ आणि डोळ्यात उत्साह, स्वातंत्र्यदिनी दिसली ‘बॉर्डर २’ ची झलक; या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
3

खांद्यावर तोफ आणि डोळ्यात उत्साह, स्वातंत्र्यदिनी दिसली ‘बॉर्डर २’ ची झलक; या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा आरोपांनी वेढलेले असताना भेट घेतली प्रेमानंद महाराजांची!
4

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा आरोपांनी वेढलेले असताना भेट घेतली प्रेमानंद महाराजांची!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.