(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
ओडिशाचे रॅपर अभिनव सिंग यांचे निधन झाले आहे. तो ‘जगरनॉट’ या नावाने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होता. अभिनवने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. तो बंगळुरूमधील त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये गूढ परिस्थितीत मृतावस्थेत आढळला. रॅपर अभिनव सिंगच्या कुटुंबाने त्याच्या पत्नी आणि इतर अनेकांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Captain America: Brave New World बॉलिवूडमध्ये बनल्यास कोणता स्टार निभावेल कोणती भूमिका?
अभिनव फक्त ३२ वर्षांचा होता
रॅपर आणि इंजिनिअर अभिनव सिंग फक्त ३२ वर्षांचा होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनव सिंग बेंगळुरूमधील कडूबीसनहल्ली येथील त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. पोलिसांनी रॅपरच्या मृत्यूप्रकरणी मराठाहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीच्या तपासात अभिनवच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले जात आहे. रॅपरच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. तसेच या बातमीने त्यांच्या कुटूंबासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
एका खाजगी कंपनीत केले होते काम
‘जगरनॉट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या रॅपरच्या कुटुंबाने असा आरोप केला आहे की, वैवाहिक मतभेद आणि पत्नीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्याने हे पाऊल उचलले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनव सिंग त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. ही घटना रविवारी रात्री घडली. अभिनव बंगळुरूमध्ये एका खाजगी कंपनीत काम करत होता.
‘हा’ दिवस रश्मीसाठी विशेष… चाहत्यांनो! जाणून घ्या, तुमच्या लाडक्या रश्मी देसाईबद्दल
‘उडिया रॅप इंडस्ट्री’चा एक लोकप्रिय चेहरा
पत्नीच्या खोट्या आरोपांमुळे नाराज झालेल्या ‘जगरनॉट’ने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचेही वृत्तांमध्ये दावे आहेत. सुरुवातीच्या अहवालांनुसार ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. तथापि, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘जगरनॉट’ म्हणून ओळखले जाणारे अभिनव सिंग हे ओडिया रॅप इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय चेहरा होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. यामध्ये मासी तोर (तन्मय साहू) चे नाव देखील समाविष्ट आहे.