Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फराह खान Cloud 9 वर, बिग बींकडून खास भेट, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘मी मस्करीत म्हटले पण….’

फराह खानचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले आहे. चित्रपट निर्माती फराहने आज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अमिताभ बच्चन यांचे हस्तलिखित पत्र शेअर करून तिचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 29, 2025 | 02:59 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलीवूडची निर्माती-दिग्दर्शिका आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने आज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फराहने अमिताभ बच्चन यांचे हस्तलिखित पत्र दाखवले आहे, जे तिच्यासाठी त्यांनी पाठवले आहे. आणि या पत्राबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करताना दिसली आहे. तसेच हा व्हिडीओ आता चर्चेत आला आहे. चाहते या व्हिडीओला चांगला प्रतिसाद देत आहेत.

पत्रामध्ये अमिताभ बच्चन यांनी काय लिहिले?
फराह जेव्हा अभिनेत्री राधिका मदनच्या घरी व्हीलॉग शूट करण्यासाठी गेली तेव्हापासून हे सर्व सुरू झाले. तिथे तिला राधिकासोबत अमिताभ बच्चन यांचे एक फ्रेम केलेले हस्तलिखित पत्र दिसले, जे पाहून तिने बिग बींकडूनही असेच पत्र मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. आज फराहला पत्र पाठवून बिग बींनी तिची अपूर्ण इच्छा पूर्ण केली आहे. आणि तिला खुश करून टाकले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

पत्राबद्दल फराहने शेअर केली पोस्ट
फराहने आज इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने अमिताभ बच्चन यांचे एक सुंदर हस्तलिखित पत्र मिळाल्याचे उघड केले आहे. ती आनंदाने म्हणाली, “मी ते विनोदाने म्हटले होते आणि अमितजींनी खरोखरच पत्र पाठवले होते. हे पत्र पहाटे ३:३० वाजता लिहिले गेले आहे. मी खूप आनंदी आहे” पत्रात अमिताभने फराहच्या सर्जनशील प्रतिभेचे कौतुक केले आहे. आणि हे पत्रवाचून फराहने आपला आनंद व्यक्त केला.

 

पत्रात काय खास आहे
या पत्रात बिग बींनी लिहिले आहे की, “प्रिय फराह, ‘स्तुती’ हा शब्द तुमच्या प्रतिभेचे कौतुक करण्यासाठी पुरेसा नाही. तुमच्या कामाबद्दल माझे प्रेम आणि आदर.” हे पत्र वाचल्यानंतर फराहने राधिकाचेही आभार मानले, जिच्या घरी हे सर्व सुरू झाले. तिने सांगितले की ती हे पत्र फ्रेम करून तिच्या पुरस्कारांसह ठेवेल. पुढे फराह म्हणाली, “अमित जी, तुम्ही माझे वर्ष बनवले! तुमचे इंग्रजी देखील अद्भुत आहे.”

Saiyaara साठी नव्हते अहान-अनित पहिली पसंती? ‘या’ प्रसिद्ध कपलसोबत मोहित सूरी बनवणार होते चित्रपट

पत्र वाचल्यानंतर फराह आणि दिलीपने विनोद केला
या व्हिडिओमध्ये पुढे, फराहचा शेफ दिलीप म्हणाला, “मॅडम, अमितजींना माझ्यासाठीही एक पत्र लिहिण्यास सांगा.” यावर फराह हसून म्हणाली, “आधी तुमच्या पत्नीला प्रेमपत्र लिहायला सांगा.” असे म्हणून हा व्हिडीओ संपला आहे. या व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फराह तिच्या मजेदार व्लॉगद्वारे चाहत्यांशी जोडत असते, आणि त्यांचं भरभरून मनोरंजन करत असते. ज्यामध्ये ती सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि लोकांना दिलीपसोबतचे तिचे मजेदार संभाषण खूप आवडते.

Web Title: Farah khan gets handwritten letter of amitabh bachchan now her cook dilip wants one too

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • entertainment
  • Farah Khan

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.