Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खराब VFX त्रास देतात…’ रणबीर कपूरच्या ‘रामायण’ टीझरवर Hrithik Roshan ने दिली मोठी प्रतिक्रिया

बॉलीवूड स्टार रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरून बरीच चर्चा सुरू आहे. अनेकांना त्याचे व्हीएफएक्स आवडले नाहीत. दरम्यान, हृतिक रोशननेही 'रामायण'च्या व्हीएफएक्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 05, 2026 | 12:15 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा टीझर चर्चेत
  • Hrithik Roshan ने दिली मोठी प्रतिक्रिया
  • व्हीएफएक्सवर अभिनेता काय म्हणाला?
 

बॉलीवूड स्टार रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि तो पाहून लोक खूप उत्सुक झाले आहेत. यामध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या अवतारात दिसत आहे. अनेकांना रणबीर कपूरचा हा लूक आवडला असला तरी, काहींनी त्याच्या दिसण्यावर टीका केली आहे. काहींनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, हृतिक रोशनने ‘रामायण’च्या व्हीएफएक्सवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘रामायण’ मध्ये बिग बींच्या जावयाची एन्ट्री; ‘रावण’ यशसोबत होणार महायुद्ध, नक्की कोण आहे हा अभिनेता?

हृतिक रोशनने शेअर केली पोस्ट

‘रामायण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून इंटरनेटवर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूरच्या प्रभू रामाच्या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे, परंतु व्हीएफएक्सला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान, हृतिक रोशनने व्हीएफएक्सबद्दल प्रेक्षकांच्या धारणांविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. हृतिकने लिहिले, “हो, काही वाईट व्हीएफएक्स असतात जे पाहताना खूप वेदना होतात. विशेषतः माझ्यासाठी. पण काही चित्रपट निर्माते असे आहेत जे अकल्पनीय गोष्टींची स्वप्ने पाहण्याचे धाडस करतात. ‘कल्की २८९८ एडी’, ‘बाहुबली’, ‘रामायण’ आणि माझ्या वडिलांचे चित्रपट ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश’ यांचे निर्माते माझे हिरो आहेत.”

 

व्हीएफएक्सबद्दल हृतिक रोशन म्हणाला, “हे लोक वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करतात आणि लाखो रुपयांची जोखीम पत्करतात, जेणेकरून ‘बॅक टू द फ्युचर’ पाहताना मला जो जादुई अनुभव आला, तोच अनुभव दुसऱ्या एका ११ वर्षांच्या मुलालाही घेता यावा. त्यांचा हा हेतूच कौतुकास्पद आहे.” हृतिकने प्रेक्षकांना आवाहन केले की, व्हीएफएक्सवर टीका करताना ते केवळ खरे दिसते की नाही यावरच नव्हे, तर ते कथेला साजेसे आहे का आणि त्यातून चित्रपट निर्मात्याचा हेतू साध्य होतो का, याचाही विचार करावा. तो पुढे म्हणाला, “कधीकधी आपण त्याला वाईट व्हीएफएक्स म्हणतो, पण कदाचित ती एक वेगळी शैली असू शकते, ज्याची आपण अपेक्षा केलेली नसते.”

मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलवणार! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझरची झलक दिसणार ‘बिग बॉस’ च्या भाऊच्या धक्क्यावर

रामायण चित्रपटातील कलाकार

रामायण या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. रणबीर कपूरने प्रभू राम, यशने रावण, साई पल्लवीने सीता, रवी दुबेने लक्ष्मण आणि सनी देओलने हनुमान यांची भूमिका साकारली आहे. लोक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Hrithik roshan talks about bad vfx in films amid mixed reactions to ramayana teaser

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ramayana

संबंधित बातम्या

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
1

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
2

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
3

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’
4

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.