Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ खरंच स्क्रिप्टेड आहे का? शोमधील ‘या’ सहकाऱ्याने केला मोठा खुलासा, म्हणाला, ”70 टक्के..”

द ग्रेट इंडियन कपिल शो' पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोमधील कलाकार किकू शारदिने दिलं आहे. ७० टक्के स्क्रिप्ट आणि ३० टक्के...

  • By अमृता यादव
Updated On: Jul 15, 2026 | 11:24 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Great Indian Kapil Sharma Show: नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो‘ सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रत्येक भागात सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत हास्यविनोदाचा तडका लावताना दिसते. मात्र, या शोबाबत प्रेक्षकांच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो—या शोतील विनोद आधीपासून स्क्रिप्टेड असतात की कलाकार ऐनवेळी ते तयार करतात? आता या प्रश्नाचं उत्तर शोमधील लोकप्रिय कलाकार किकू शारदा याने दिलं आहे.

प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना किकू शारदाने शोच्या पडद्यामागील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याने सांगितलं की, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ पूर्णपणे स्क्रिप्टेड नाही. कार्यक्रमाचा सुमारे ७० टक्के भाग आधीच लिहिलेला आणि नियोजित असतो, तर उर्वरित ३० टक्के भाग कलाकारांच्या उत्स्फूर्त संवादांवर आणि ऐनवेळी सुचलेल्या विनोदांवर अवलंबून असतो.

किकूच्या मते, चित्रीकरणादरम्यान अनेकदा संभाषण अनपेक्षित वळण घेतं. अशा वेळी कलाकार आपल्या विनोदी टायमिंग आणि हजरजबाबीपणाचा वापर करून नवीन संवाद आणि पंच तयार करतात. त्यामुळे शो अधिक नैसर्गिक आणि मनोरंजक वाटतो.

याशिवाय, शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटी पाहुण्यांना कलाकार कोणत्या वेशात येणार आहेत किंवा कोणते विनोद करणार आहेत, याची कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या नैसर्गिक प्रतिक्रिया टिपण्यासाठी निर्माते हा फॉर्म्युला वापरतात. त्यामुळे त्यांच्या हसण्यामागे कोणताही बनाव नसून त्या प्रतिक्रिया पूर्णपणे अस्सल असतात.

“तुकाराम मुंढेंकडे शिक्षण खातंही सोपवा”, मराठी अभिनेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन, म्हणाला, ‘System खऱ्या अर्थाने मुळापासून’

पॉडकास्टमध्ये किकूने सलमान खानचा किस्साही सांगितला. त्याच्या मते, सलमानला हसवणं हे टीमसाठी मोठं आव्हान असतं. अनेकदा टीमला अत्यंत मजेशीर वाटणाऱ्या विनोदांवर सलमान कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. मात्र, एखादा कलाकार सहजपणे काहीतरी अनपेक्षित बोलला तर सलमान मनापासून हसतो.

किकूने कपिल शर्माच्या विनोदी टायमिंगचंही भरभरून कौतुक केलं. त्याने सांगितलं की, एखादा विनोद अपेक्षेप्रमाणे रंगला नाही आणि स्टुडिओत शांतता पसरली, तर अशा परिस्थिती हाताळण्यात कपिल शर्मा एकदम पटाईत आहे. तो वातावरण पुन्हा हलकंफुलकं करतो. त्यामुळे कार्यक्रमाचा फ्लो कायम राहतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन सुरू राहतं.

Aamir Khan: ‘Love Jihad’च्या आरोपांना आमिरचं सडेतोड प्रत्युत्तर; कुटुंबाचं उदाहरण देत म्हणाला, ‘माझ्या बहिणींनी हिंदू मुलांशी..”

Web Title: Is the great indian kapil show really scripted kiku sharda makes a big revelation reveals the truth behind the scenes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Kapil Sharma
  • Salman Khan
  • The Great Indian Kapil Sharma Show

संबंधित बातम्या

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक
1

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग
2

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.