Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणाल कामराच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उतरल्या मैदानात, काय म्हणाले सेलिब्रिटी ?

कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी करून वाद निर्माण केला आहे. स्वरा भास्कर आणि जया बच्चन यांनी कामराला पाठिंबा दिला आहे. कामरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2025 | 05:14 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोवरील वाद पूर्णपणे संपला नाही तोच आता स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत सापडला आहे. तेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे. खरं तर, एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून हा विनोदी कलाकार वादात सापडला आहे. सोमवारी हा वाद इतका वाढला की त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्याच्या शो ची तोडफोडही करण्यात आली आहे. दरम्यान, कुणाल कामराला बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कामराला अभिनेत्री स्वरा भास्करने पाठिंबा दिला, तर दुसरीकडे खासदार-अभिनेत्री जया बच्चन यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे.

स्वरा भास्करने इंस्टाग्रामच्या स्टोरीज सेक्शनवर या प्रकरणाशी संबंधित अनेक पोस्ट शेअर केल्या. कामराचा फोटो शेअर करताना तिने लिहिले, “सत्य.” दुसऱ्या पोस्टमध्ये स्वरा एकनाथ शिंदेंवर टीका करताना दिसली. हॅबिटॅट क्लब या ठिकाणाचा उल्लेख करत तिने लिहिले, “एकनाथ शिंदे मुंबईच्या इतर भागांसारखे हॅबिटॅट करताना दिसेल आहेत.” असं लिहून तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

इमरान हाश्मीने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली भेट, ‘आवारापन २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

जया बच्चन यांनी कुणाल कामराला दिला पाठींबा
एएनआयशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या, ‘जर बोलण्यावर असे निर्बंध लादले गेले तर मीडियातील लोकांचे काय होईल?’ ते तुम्हालाही बंदी घालत आहेत. उद्या ते जया बच्चनची मुलाखत घेऊ नका असे म्हणतील. शेवटी आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कारवाई फक्त लढाई झाल्यावरच होते का? विरोधकांना मारून टाका, महिलांवर बलात्कार करा. त्याला मारून टाका. विरोधकांना बोलू देऊ नका. त्याला फाशी द्या, आता आणखी काय उरले आहे?’ असं त्या म्हणाल्या आहेत.

 

#WATCH | On Kunal Kamra row, SP MP Jaya Bachchan says, “…If there is restriction on speaking, what will become if you? You are anyway in a bad situation. There are restrictions on you. You would be told to speak just on this and nothing else, that do not interview Jaya… pic.twitter.com/GWpkNyEDHS

— ANI (@ANI) March 24, 2025

अभिनेत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दलही बोलताना दिसली
एवढेच नाही तर जया बच्चन इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, ‘तुम्ही सत्तेसाठी तुमचा मूळ पक्ष सोडला. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. तेव्हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला नव्हता का?’ असे त्या म्हणताना दिसत आहेत.

कुणाल कामरा विरोधात मुंबईतील एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात बीएनएसच्या कलम ३५३(१)(ब), ३५३(२) आणि ३५६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

“ब्लॉकबस्टर चित्रपट…”; Kesari 2 चा धमाकेदार टीझर पाहून चाहत्यांनी दिली जबरदस्त प्रतिक्रिया!

कुणाल कामराचे प्रकरण काय होते?
विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी रविवारी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारा एक व्हिडिओ अपलोड केला. व्हिडिओमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना ‘देशद्रोही’ म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील सदस्यांनी या व्हिडिओवर जोरदार टीका केली. नेते राहुल कनाल यांनी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात कामरा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, कामरा यांनी खार पश्चिम येथे नुकत्याच झालेल्या एका लाईव्ह शो दरम्यान उपमुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली.

Web Title: Jaya bachchan swara bhasker angry on eknath shinde vs kunal kamra controversy supports comedian

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • entertainment
  • Jaya Bachchan
  • Standup comedian

संबंधित बातम्या

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक
1

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.