Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या मालिकांमध्ये या आठवड्यात मोठी वळणं पाहायला मिळणार आहेत. प्रेमाची कबुली, संघर्ष आणि मास्टरमाइंडचा मोठा खुलासा होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 06, 2026 | 03:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Marathi TV Serial: ‘ दर आठवड्याला आपल्या आवडत्या मालिकांमध्ये पुढे काय घडणार, कोणत्या नात्याला नवं वळण मिळणार आणि कोणते धक्कादायक खुलासे होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. यंदाच्या आठवड्यातही ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या मालिकांमध्ये महत्त्वाची वळणं पाहायला मिळणार आहेत. कुठे प्रेम व्यक्त करण्यासाठी ग्रँड प्रपोजलची तयारी सुरू आहे, तर कुठे आई-मुलीच्या नात्याभोवतीचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. दुसरीकडे ‘तारिणी’मध्ये एका मोठ्या कटामागचा मास्टरमाइंड समोर येणार आहे. त्यामुळे या तिन्ही मालिकांचे आगामी भाग उत्कंठा वाढवणारे ठरणार आहेत.

‘दीपज्योती’मध्ये दीप करणार ज्योतीला प्रपोज?

गौरी घरी परतल्यानंतर ज्योतीने पुरुषोत्तम आणि आत्यामधील वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, ज्योतीचं आपल्यावर लक्ष असल्याचं दीपच्या लक्षात येतं. त्यामुळे तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दीपने खोटी गर्लफ्रेंड आणण्याचा प्लॅन आखला. मात्र मित्रांनी केलेल्या गोंधळामुळे एकीऐवजी चक्क चार मुली दीपच्या आयुष्यात आल्याचं चित्र निर्माण होतं.

यामुळे ज्योती आणि आत्या यांचा दीपचं चार वेगवेगळ्या मुलींशी काहीतरी सुरू असल्याचा गैरसमज होतो. मात्र दीपच्या मनात वेगळंच काही सुरू आहे. तो आपल्या मित्रांसमोर ज्योतीवरील प्रेमाची कबुली देतो. ज्योतीकडून नकार मिळण्याची किंवा तिच्या हातचा मार खाण्याची भीती त्याला वाटत असते.

मात्र ज्योतीच त्याला, ‘तुला कुणी आवडतंय का?’ असा थेट प्रश्न विचारते. त्यानंतर दीप धाडस करण्याचा निर्णय घेतो. आता तो ज्योतीला आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी चक्क ग्रँड प्रपोजलची तयारी करणार आहे. दीपचं हे खास प्रपोजल कसं असेल आणि त्यानंतर त्यांच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘कमळी’मध्ये सरोज-कामिनी आमनेसामने

‘कमळी’च्या आयुष्यातील संघर्ष आता नव्या टप्प्यावर पोहोचणार आहे. आतापर्यंत अनेक गोष्टी मनात ठेवून परिस्थितीचा सामना करणारी सरोज आता गप्प बसणार नाही. आपल्या मुलीच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी तिला आठवत असून, कमळीला तिचं हक्काचं स्थान मिळवून देण्याचा निर्धार ती करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर सरोज आणि कामिनी यांच्यात थेट आमना-सामना होणार आहे. सरोजच्या ठाम भूमिकेमुळे दोघींमधील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. दरम्यान, कमळीचाही लूक बदलणार असून, तिचा हा नवा लूक तिच्या व्यक्तिमत्त्वातील बदलाची नांदी ठरणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडणार आहे.

एकीकडे सरोज आपल्या मुलीसाठी ठामपणे उभी राहणार आहे, तर दुसरीकडे कामिनीसमोरही नवं आव्हान उभं राहणार आहे. सरोजच्या आक्रमक भूमिकेला कामिनी काय उत्तर देणार? कमळीला तिचं हक्काचं स्थान मिळणार का? आणि कमळीचा बदललेला लूक तिच्या आयुष्यातील कोणत्या नव्या पर्वाची सुरुवात करणार, याची उत्सुकता लागली आहे.

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

‘तारिणी’मध्ये मास्टरमाइंडचा चेहरा होणार उघड

‘तारिणी’मध्ये मागील आठवड्यात पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर खांडेकर कुटुंबात श्राद्धाचा प्रसंग पाहायला मिळाला. दरम्यान, JJ ला संपवण्यासाठी टीम तारिणीने आखलेला डाव यशस्वी होतो. JJ ला आलेला अनोळखी फोन हा टीम तारिणीने आखलेला सापळा असल्याचं तिच्या लक्षात येतं.

यानंतर युवराजला एक महत्त्वाचा फोन येतो. या रहस्यमय मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी तो त्याला भेटण्याचा निर्णय घेतो. अखेर युवराज त्या मास्टरमाइंडला भेटतो. मात्र त्याच्यासमोर आलेला चेहरा पाहून युवराजच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे.

आतापर्यंत पडद्यामागून सूत्रं हलवणारा हा मास्टरमाइंड कोण आहे, याचा मोठा खुलासा या भेटीत होणार आहे. या संपूर्ण कटामागचं कारण काय आहे? त्याचा नेमका उद्देश काय? आणि या खुलाशानंतर युवराज कोणतं पाऊल उचलणार? टीम तारिणीला या कटाची माहिती मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

त्यामुळे ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या तिन्ही मालिकांमध्ये येणारी ही नवी वळणं प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका आपल्या आवडत्या मालिका ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ फक्त झी मराठीवर.

Umesh Kamat Priya Bapat Anniversary: उमेश -प्रिया यांच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करत केलं प्रेम व्यक्त

Web Title: Marathi tv serial deepjyoti kamali tarini upcoming twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi serial news
  • tv serial

संबंधित बातम्या

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
1

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
2

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
3

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
4

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.