Kartik Aaryan (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? घरातले दिवे, फराळाचा वास, आईच्या हातची करंजी, बाबांसोबत फटाके, आणि मित्रांसोबतची मस्ती. पण विचार करा, हाच सण जर घरापासून लांब, परदेशात एकट्याने साजरा करायला लागला तर कसं वाटेल? अगदी तसंच काहीसं यंदा कार्तिक आर्यन सोबत झालंय.
कार्तिक सध्या लंडनमध्ये आहे. त्याच्या नव्या सिनेमाचं शूटिंग तिथे चालू आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी त्याला घरापासून दूर, एकट्याने साजरी करावी लागली. घरात सगळे दिवाळी साजरी करत असतील, आणि तो तिथे लंडनच्या थंडीत एकटा असेल, याची कल्पनाच नको. दिवाळीच्या निमित्ताने कार्तिकने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र, त्याच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
“हॅपी दिवाळी. घरी सगळ्यांची खूप आठवण येतेय”, असं त्याने लिहिलं आहे. या छोट्याशा पोस्टमधून घरापासून दूर असताना सणाच्या दिवसांत आपल्या माणसांची आठवण कशी सतावते, याची भावना त्याने व्यक्त केली.
त्याने फोटो टाकला आणि त्याखाली फक्त एकच ओळ लिहिली – “हॅपी दिवाळी. घरी सगळ्यांची खूप आठवण येतेय.” बस, इतकंच. पण या एका ओळीत त्याच्या मनातलं सगळं आलं. मोठा स्टार असला तरी शेवटी तो पण माणूसच आहे. सणाच्या दिवशी त्याला पण घरची, आई-बाबांची, बहिणीची आठवण येते.
त्याचा हा फोटो बघून चाहत्यांनी पण भरभरून प्रेम दिलं. कोणी म्हणालं, “आम्ही आहोत ना तुझं कुटुंब”, कोणी म्हणालं, “लवकर घरी ये.” त्याची ती पोस्ट बघून बऱ्याच लोकांना आपलीच आठवण आली. कारण नोकरी-धंद्यासाठी आपल्यापैकी बरेच जण दिवाळीला घरापासून दूर असतात. त्यामुळे कार्तिकची ती भावना सगळ्यांना आपलीशी वाटली.
दरम्यान, कार्तिक सध्या लंडनमध्ये त्याच्या आगामी ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे यंदा त्याला कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करता येत नसली, तरी त्याच्या या भावनिक पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.तो लंडनमध्ये ‘कॅप्टन इंडिया’ या सिनेमाचं शूटिंग करतोय. हा सिनेमा त्याच्या करिअरमधला खूप मोठा सिनेमा असणार आहे.
त्यामुळे शूटिंगचं वेळापत्रक पण खूप टाईट आहे. दिवाळीसाठी सुट्टी घेऊन घरी येणं त्याला जमलंच नाही. काम आहे तर करावंच लागणार.पण एक गोष्ट खरी आहे, कलाकारांचं आयुष्य बाहेरून खूप चमकदार दिसतं. पैसा, नाव, फॅन्स, सगळं असतं. पण सणाच्या दिवशी घरापासून दूर राहणं, हे त्यांच्यासाठी पण तितकंच अवघड असतं. आपण घरी दिवाळी साजरी करतो, आणि ते सेटवर दिवे लावून दिवाळी साजरी करतात.
View this post on Instagram
कार्तिकने लंडनमधून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पण त्याच्या त्या शुभेच्छांमागे घरची ओढ स्पष्ट दिसत होती. आता चाहते त्याच्या ‘कॅप्टन इंडिया’ ची वाट बघत आहेत. आणि कार्तिक पण शूटिंग संपवून लवकर घरी जाण्याची वाट बघत असेल. कारण दिवाळी संपली तरी घरी गेल्यावर घरच्यांसोबतची दिवाळी वेगळीच असते.शेवटी काय, दिवाळी कुठेही साजरी करा, पण मन मात्र घरीच असतं. कार्तिकची पोस्ट हेच सांगून गेली.






