फोटो सौजन्य - Instagram
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट ‘किंगडम’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची खूप क्रेझ होती. आता अखेर विजयचे चाहते चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावरही चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला का नाही हे आपण आता जाणून घेणार आहोत.
वापरकर्त्यांनी काय म्हटले?
विजयचा हा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक एक्स वर त्यांचे पुनरावलोकन पोस्ट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘चित्रपटाची कथा अनावश्यकपणे ओढली गेली आहे. भावना पुन्हा पुन्हा मांडल्या गेल्या आहेत. दृश्ये देखील खूपच साधी वाटत आहेत. पहिला भाग अनेक प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेतो. त्याला ५ पैकी ०.५ रेटिंग देण्यात येत आहे.’ असे म्हणून प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रतिसाद दिला आहे.
राजसोबत डिनर डेटवर दिसली समंथा रूथ प्रभू, पापाराझींवर का संपताला दिग्दर्शक? पाहा VIDEO
दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘चित्रपटात ३ तासांचा जास्त अॅक्शन दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात फक्त हायपचा ओव्हरडोस आणि कंटेंटचा शून्य डोस दाखवण्यात आला आहे. कथाही योग्य वाटत नाही आहे. मी त्याला ५ पैकी १ रेटिंग देऊ इच्छितो.’ तिसऱ्या युजरने लिहिले, ‘पहिला भाग ठीक वाटला. अनिरुद्धच्या संगीताने आणि विजयच्या अॅक्शन सीन्सने चित्रपट चांगला वाटत आहे. मी त्याला ३ रेटिंग देऊ इच्छितो.’ असे म्हणून चाहत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
– First Half: ⭐ 0.5/5
Dragged to the core… recycled mass elevations, pointless emotions, loud BGM trying hard to cover the hollow scenes.
Audience ki patience test chesina half.#Kingdom #KingdomOnJuly31st pic.twitter.com/wHPKI1bHJe— 𝐕𝐢𝐡𝐚𝐚𝐧 (@TheRealPKFan) July 30, 2025
चौथ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘मी या चित्रपटासाठी आधीच खूप उत्सुक होतो. गौतम थिन्ननुरीचे नाव ऐकल्यापासून मी या चित्रपटाची वाट पाहत होतो. पण हा चित्रपट माझ्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. चित्रपट वाईट नाही पण जितका तो गाजला तितकाच त्यातून जास्त अपेक्षा होत्या. विजय देवरकोंडाने खूपच चांगला अभिनय केला आहे.’ असे लिहून चौथ्या चाहत्याने चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे.
पाचव्या वापरकर्त्याने लिहिले, ‘विजय देवेराकोंडाने पहिल्या भागात दमदार अभिनय केला आहे. त्याचे अॅक्शन सीन्स खूप चांगले आहेत. चित्रपटाचा सेट-अप खूप चांगला आहे. दुसरा भाग काही ठिकाणी कंटाळवाणा वाटतो. त्यातील भावनिक सीन्स अधिक चांगल्या प्रकारे चित्रित करता आले असते. एकूणच, किंगडम चित्रपट पाहण्यासारखा आहे.’ असे म्हणून चाहत्याने चित्रपटाचे कौतुक केले आहे.
विजयने चित्रपटासाठी बदलला स्वतःचा लूक
निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केल्यापासून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. विजयचा हा चित्रपट या वर्षातील त्याचा पहिला चित्रपट आहे. यासाठी त्याने खूप मेहनतही घेतली आहे. त्याने त्याचा संपूर्ण लूक बदलला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये अधिक चर्चा निर्माण झाली. विजयसोबत, भाग्यश्री बोरसे आणि सत्यदेव कंचराणा हे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत.