फोटो सौजन्य - Instagram
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज ३१ जुलै रोजी वाढदिवस आहे. या वर्षी ती ३४ वर्षांची झाली आहे. हा वाढदिवस कियारासाठी खूप खास आहे कारण काही दिवसांपूर्वीच ती आई झाली आहे. कियारा अडवाणीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात लॉटरी लागलीच आहे पण, तिच्या व्यावसायिक आयुष्यातही ती वेगाने यशाच्या शिडी चढताना दिसते आहे. बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेकदा अभिनेत्रींना वादाचा सामना करावा लागतो. तसेच, कियारा अद्याप कोणत्याही वादाचा भाग बनलेली नाही. तसेच ती नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत राहिली अभिनेत्री आहे.
टॉम क्रूज आपल्यापेक्षा २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट?
कियारा अडवाणीने वादाने नव्हे तर तिच्या कामाने मन जिंकले
कियारा अडवाणी ही बॉलीवूडमधील अशा काही निवडक अभिनेत्रींमध्ये गणली जाते ज्या कोणत्याही वादात न पडता लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाल्या आहेत. कियारा अडवाणीने एकही वाद न होता तिचे करिअर घडवले आहे. आजपर्यंत तिचे कोणत्याही अभिनेत्याशी भांडण झालेले नाही किंवा कोणत्याही चित्रपटाबाबत कोणताही वाद झालेला नाही. त्यामुळे कियारा अडवाणी इतक्या प्रसिद्धीशिवाय इतकी यशस्वी होण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे तिची मेहनत. इतर जण प्रसिद्धी मिळवण्याचे मार्ग शोधत असताना, कियाराने तिच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारची भूमिका साकारून सर्वांचा विश्वास जिंकला आहे.
पदार्पण चित्रपट फ्लॉप झाला, परंतु नंतरचे सगळे चित्रपट ठरले हिट
कियाराने ‘फगली’ चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि त्यानंतर कियारा ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये दिसली आणि येथून तिचे नशीब उघडले. त्यानंतर तिने ‘लस्ट स्टोरीज’, ‘कबीर सिंग’ आणि ‘गुड न्यूज’, ‘गिल्टी’, ‘लक्ष्मी’ आणि ‘इंदू की जवानी’ मध्ये वेगवगेळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले. यानंतर कियारा अडवाणीचा ‘शेरशाह’ हा चित्रपट आला आणि या चित्रपटामुळे कियाराला बॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळालेच तसेच तिला तिचे खरे प्रेमही मिळाले. कियाराचा हा चित्रपटही सुपरहिट झाला आणि लोकांना सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा तिचा रोमान्सही आवडू लागला.
Bigg Boss 19 च्या घरात कोणते नवे स्पर्धक करणार एन्ट्री? स्पर्धकांची यादी आली समोर
‘शेरशाह’ कडून मिळालेले यश आणि प्रेम
कियारा अडवाणीने नंतर २०२३ मध्ये सिद्धार्थशी लग्न केले आणि बॉलीवूडमध्ये तिचा चमकदार अभिनय अजूनही सुरू आहे. कियारा आता लवकरच ‘वॉर २’ चित्रपटात दिसणार आहे. तिचा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि आई झाल्यानंतरचा हा तिचा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात कियारा अॅक्शन आणि रोमान्स करताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये तिच्यासोबत हृतिक आणि ज्युनियर एनटीआर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.