Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुलसी’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित!

'क्युँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना ही मालिका पुन्हा एकदा नव्या आवृत्तीमध्ये पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा काय असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 19, 2025 | 10:26 AM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘स्टार प्लस’ वाहिनी नेहमीच भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या रूजलेली कौटुंबिक नाट्ये सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे, वाहिनीवरील प्रत्येक मालिकांनी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. देशाच्या छोट्या पडद्यावरील कथाकथनाच्या सीमांना पार करत वेगळे काहीतरी देऊ करणारी ही वाहिनी नातेसंबंध, मूल्ये आणि भारतीय घराघरांत होणारी स्थित्यंतरे मालिकांद्वारे टिपत राहिल्याने प्रेक्षकांशी सातत्याने जोडलेली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या सर्वात प्रतिष्ठित निर्मितींपैकी एक असलेली ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका केवळ सासू – सून शैली पुनर्परिभाषित करते असे नाही तर ही मालिका लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहे.

या मालिकेच्या नव्या सीझनच्या घोषणेमुळे सोशल मीडियावर नवे वादळ निर्माण झाले होते आणि पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर हा उत्साह एका नव्या उंचीवर गेला. मालिकेच्या थीम ट्यूनने प्रेक्षकांच्या आठवणी जागवल्या आणि नव्या सीझनची मोठी चर्चा सुरू झाली. या प्रोमोला डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांनीही मोठा प्रतिसाद दिला. पहिल्या प्रोमोने केवळ नव्या, आगामी सीझनची झलक दाखवली असे नाही, तर या प्रोमोत तुलसीचा लूकदेखील सर्वांसमोर आला, ज्यात एक डौल होता आणि सामर्थ्यही होते. या प्रोमोने चाहत्यांना त्यांच्या आवडत्या आणि त्यांनी भरभरून कौतुक केलेल्या शक्तिशाली मातृसत्तेची आठवण करून दिली.

चित्रपटगृहानंतर आता ‘Housefull 5’ चा ओटीटीवर धमाका, पण बघण्यासाठी पूर्ण करावी लागेल ‘ही’ खास अट

आता, नवा प्रोमो दाखल झाल्यानंतर, निर्मात्यांनी व्हिडिओ कॅप्शनसह तो शेअर केला आहे. त्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत- “बदलते वक्त में एक नए नजरिए के साथ लौट रही है तुलसी! उनके इस नये सफर में जुडने के लिए क्या आप हैं तय्यार?’. या नव्या प्रोमोने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भावनिक तारा झंकारतो. नॉस्टॅल्जियामध्ये एक नवा दृष्टिकोन मिसळतो. प्रोमोच्या सुरुवातीला तुलसी भूतकाळातील आठवणी शेअर करताना दिसते आणि पुढे काय घडणार आहे याची ती मांडणी करते. गोम्झीच्या शर्टवर त्याचे नाव लिहिलेले असल्यापासून, सासू सून नातेसंबंधातील गडबड-गोंधळ लक्षात ठेवण्यापर्यंत, ती बदलत्या काळाविषयी बोलते तसेच एखाद्याच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व कथन करते.

 

या प्रोमोतून आधुनिक आव्हानांना तोंड देणाऱ्या तुलसीची ताकद आणि खोलवर रूजलेल्या कौटुंबिक परंपरा ठळकपणे दिसून येतात. हा प्रोमो भूतकाळातील परिचित आकृतिबंधांपासून पुनर्कल्पित वर्तमानकाळातील दृश्यांकडे वळतो, ज्यामुळे आठवणी आणि आधुनिकतेची यांत सहज सरमिसळ होते. ही केवळ एक मालिका नाही तर भावनांचा पुनर्जन्म आहे, याची एक शक्तिशाली आठवण करून देत हा प्रोमो संपतो.

दोन स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी! अमृता सुभाष- सोनाली कुलकर्णी यांच्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच पहिल्यांद

गेल्या काही वर्षांत, ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ केवळ एक दैनंदिन मालिका राहिली नाही, तर ती एक सांस्कृतिक घटना बनली. विराणी कुटुंब आणि त्यांचे शांतिनिकेतन घर हे घरोघरी लोकप्रिय झाले, भारतीय दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकांच्या सामूहिक स्मृतीत खोलवर रूजले. तो वारसा पुन्हा प्रसारित होण्याद्वारे, फॅन क्लबद्वारे आणि आता, एका नवीन सीझनद्वारे जिवंत आहे. २९ जुलैपासून रात्री १०:३० वाजता केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’चा भव्य प्रीमियर प्रेक्षकांना आता पुन्हा पाहायला मिळणार आहे. आता या मालिकेने चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Kyunki saas bhi kabhi bahu thi serial new promo released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • ekta kapoor
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा
1

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा
2

मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा

‘भिकाऱ्याच्या ताटातुनही जेवण परत घेत नाही…’, कुनिका आणि झीशानमध्ये जोरदार राडा
3

‘भिकाऱ्याच्या ताटातुनही जेवण परत घेत नाही…’, कुनिका आणि झीशानमध्ये जोरदार राडा

‘निशाणची’च्या ट्रेलर मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, ऐश्वर्य ठाकरेने बाप्पाच्या चरणी मानले आभार!
4

‘निशाणची’च्या ट्रेलर मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, ऐश्वर्य ठाकरेने बाप्पाच्या चरणी मानले आभार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.