(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, सोनम बाजवा, जॅकलिन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्यासह २० कलाकारांचा अभिनय असलेला ‘हाऊसफुल ५’ हा कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट चित्रपटगृहांनंतर आता ओटीटीवर आपली जादू दाखवणार आहे. हा चित्रपट ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि २०० कोटींच्या क्लबमध्ये त्याने चांगली कमाई केली आहे. ‘हाऊसफुल’ फ्रँचायझीचा पाचवा चित्रपट, ‘हाऊसफुल ५’, आता थिएटरनंतर ओटीटी जगात प्रवेश धमाका करणार आहे. तसेच, जर तुम्हाला तो ओटीटीवर पहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे.
चित्रपट पाहण्यासाठी आहे एक अट
आता हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. तथापि, तो सध्या सबस्क्रिप्शनसह नाही तर भाड्याने पाहता येणार आहे. दोन्ही भाग म्हणजेच 5A आणि 5B पाहण्यासाठी प्रेक्षकांना सुमारे 700 रुपये खर्च करावे लागणार आहेत. काही काळानंतर तो सर्व प्राइम सबस्क्राइबर्सना मोफत उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट आता पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’ मध्ये दिसणार ‘तुलसी’ चे नवे रूप, एकता कपूरने दिली माहिती
चित्रपटगृहांमध्ये मिळाला चांगला प्रतिसाद
६ जून २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे कारण म्हणजे दिग्दर्शकाने दुहेरी शेवटची ठेवलेली संकल्पना. हा चित्रपट हाऊसफुल ५ए आणि हाऊसफुल ५बी या दोन भागात सादर करण्यात आला होता, ज्यामुळे प्रेक्षकांना वेगवेगळे शेवट पाहायला मिळाले. हा कॉमिक-थ्रिलर चित्रपट रहस्य, थरार आणि हास्याचे मिश्रण आहे, ज्याने अनेकांना प्रभावित केले. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला.
हा चित्रपट २५० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. हा चित्रपट त्याच्या बजेट आणि स्टारकास्टमुळे विशेष चर्चेत होता. सुमारे १९ कलाकारांना पडद्यावर एकत्र आणणे हे स्वतःच एक मोठे आव्हान होते. चित्रपटाच्या टीममध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, श्रेयस तळपदे, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, दिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, चित्रांगदा सिंग, सोनम बाजवा, सौंदर्या शर्मा आणि निकितिन धीर असे कलाकार दिसले आहेत.
‘या’ कारणामुळे राकेश रोशन यांना ICU मध्ये केले होते दाखल, आता कशी आहे अभिनेत्याची तब्येत?
बॉक्स ऑफिसवर कामगिरी कशी होती?
‘हाऊसफुल ५’ ने जगभरात बॉक्स ऑफिसवर २८८.६३ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश मिळवले आहे, परंतु अपेक्षेप्रमाणे रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरले आहे. तथापि, हा चित्रपट विनोदी प्रेमींसाठी एक पूर्ण पॅकेज ठरला आहे. आता हा चित्रपट सिनेमागृहानंतर ओटीटी काय धमाका करतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.