Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोट्या कीटकाचा चावा, MS Dhoni फेम अभिनेत्याला पडले भारी! प्रकृतीत बिघाड; थेट गाठला रुग्णालयाचा रस्ता

प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते राजेश शर्मा यांना विषारी कीटक किंवा कोळ्याने चावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रक्ताची गुठळी होऊन ती फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्याचा धोका असल्याने त्यांच्यावर कडेकोट लक्ष ठेवण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2026 | 08:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजेश शर्मा यांना कीटकाने चावल्याची घटना.
  • संसर्ग वाढल्याने अभिनेत्याला रुग्णालयात दाखल; प्रकृती अद्याप धोक्याबाहेर नाही.
  • पायाला गंभीर संसर्ग, रक्ताची गुठळी होण्याची शक्यता; डॉक्टरांकडून कडेकोट निरीक्षण.
प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग सुरू असताना त्यांना एका विषारी कीटकाने किंवा कोळ्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला ही बाब किरकोळ वाटल्याने त्यांनी तातडीने उपचार घेतले नाहीत. मात्र, काही तासांतच त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड झाला आणि अखेर त्यांना पश्चिम बंगालमधील धाकुरिया येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ramayana Trailer : तारीख ठरली! बस काही दिवस आणखीन; ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार रामायण सिनेमाचा ट्रेलर

राजेश शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली आहे. निवेदनानुसार, शूटिंगनंतर राजेश शर्मा स्थानिक तंत्रज्ञांशी दाट झाडीत गप्पा मारत असताना त्यांना कीटकाने चावा घेतला. त्यावेळी त्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, सुमारे सहा तासांनंतर त्यांच्या उजव्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतरही ते कोलकात्याकडे विमानाने रवाना झाले. प्रवासादरम्यान त्यांना तीव्र ताप, अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.

दुसऱ्या दिवशी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या उजव्या पायातील संसर्ग पायाच्या बोटांपासून गुडघ्यापर्यंत पसरला असून प्रभावित भागावर मोठे फोडही आले आहेत. डॉ. अविजित भट्टाचार्य यांनी सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत निश्चित काही सांगणे लवकर असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, रक्ताची गुठळी तयार होऊन ती फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजेश शर्मा यांच्यावर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष असून ते अद्याप धोक्याबाहेर नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

Internet झाले गरम! भाईईईई… Toxic च्या गाण्याने केली ‘Tabaahi’; कियारा आडवाणीला पाहून तरुणाई घायाळ

दरम्यान, ही घटना प्रभासच्या ‘फौजी’ की ‘स्पिरिट’ या कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कुटुंबीयांनी या कठीण काळात साथ दिल्याबद्दल बंगाल मोशन पिक्चर्स आर्टिस्ट्स फोरम, मित्रपरिवार, चाहत्यांसह अभिनेते प्रसेनजित चॅटर्जी यांचे विशेष आभार मानले आहेत.

Web Title: M s dhoni fame actor rajesh sharma was admitted to the hospital after being bitten by an insect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Celebrity
  • Death
  • Health Updates
  • M.S. Dhoni

संबंधित बातम्या

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…
1

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
2

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
3

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
4

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.