Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malaika Arora Boyfriend: ग्रीसमधील सुट्ट्यांमध्ये ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसली मलायका अरोरा? एका फोटोने रंगली चर्चा

ग्रीसमधील सुट्ट्यांदरम्यान शेअर केलेल्या फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पोस्टमधील शेवटच्या फोटोमध्ये ती एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसल्याने सोशल मीडियावर 'मिस्ट्री मॅन'ची चर्चा रंगली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2026 | 08:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ग्रीसमधील सुट्ट्यांदरम्यान तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चाहत्यांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे एका फोटोत ती एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसत असल्याने हा ‘मिस्ट्री मॅन’ नेमका कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव

मलायकाने इन्स्टाग्रामवर ग्रीसमधील सुट्टीतील अनेक फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसते, तर काही छायाचित्रांमध्ये तिचा स्टायलिश लूक आणि फिटनेस विशेष लक्ष वेधून घेत आहे. रंगीबेरंगी बीचवेअरपासून ते संध्याकाळच्या आकर्षक ड्रेसपर्यंत तिच्या प्रत्येक लूकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

मात्र, पोस्टमधील शेवटच्या फोटोने सर्वाधिक चर्चा रंगवली. या छायाचित्रात मलायका समुद्रकिनारी एका व्यक्तीसोबत उभी असून दोघांचाही फोटो पाठीमागून टिपण्यात आला आहे. त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्यामुळे तो कोण आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही चाहत्यांनी हा तिचा नवा बॉयफ्रेंड असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत मलायकाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्या व्यक्तीची ओळख विचारली आहे. काहींनी “हा नवीन बॉयफ्रेंड आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला, तर काहींनी केवळ तिच्या स्टाईल, फिटनेस आणि सुट्टीतील फोटोंचे कौतुक केले. सध्या सोशल मीडियावर या ‘मिस्ट्री मॅन’ची जोरदार चर्चा असली, तरी त्या व्यक्तीची ओळख किंवा मलायकासोबतचे त्याचे नाते याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या या चर्चांकडे केवळ सोशल मीडिया तर्क म्हणूनच पाहिले जात आहे.

‘सौभाग्यवती सरपंच २’चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; ‘या’ तारखेपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला

 

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट!

मलायका अरोरा आणि अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान यांनी १९९८ मध्ये विवाह केला होता. जवळपास १९ वर्षे संसार केल्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आणि मे २०१७ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. या दोघांना अरहान खान नावाचा मुलगा असून, घटस्फोटानंतरही ते त्याचे सहपालन (Co-parenting) करत आहेत. विभक्त होण्यामागील नेमके कारण दोघांनीही कधी सार्वजनिकपणे सांगितले नाही. त्यांनी हा निर्णय परस्पर संमतीने घेतल्याचे स्पष्ट केले होते. घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती, तर अरबाज खानने २०२३ मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत विवाह केला.

Web Title: Malaika arora boyfriend photos of greece

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Malaika Arora
  • Malaika Arora Photos

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.