Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मटका किंग’चा दमदार ट्रेलर रिलीज; विजय वर्माच्या भूमिकेने वेधलं लक्ष, नागराज मंजुळेची भव्य मांडणी चर्चेत

विजय वर्मा अभिनित ‘मटका किंग’ या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान ही वेब सीरिज १७ एप्रिलपासून प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 02:02 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘मटका किंग’चा दमदार ट्रेलर रिलीज
  • विजय वर्माच्या भूमिकेने वेधलं लक्ष
  • नागराज मंजुळेची भव्य मांडणी चर्चेत
भारतामधील लोकप्रिय मनोरंजन मंचावर येणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘मटका किंग’ या मूळ नाट्यमालिकेचा दमदार आणि थरारक ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या बॉम्बेच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि यशासाठी मोजावी लागणारी किंमत यांचा वेध घेणारी आहे.

अभय कोरान्ने लिखित आणि नागराज मंजुळे यांनी निर्मित, दिग्दर्शित आणि सहलेखन केलेली ही मालिका एका सामान्य कापूस व्यापाऱ्याच्या असामान्य प्रवासाची कहाणी सांगते. ट्रेलरमध्ये ब्रिज भट्टी (विजय वर्मा) या व्यक्तिरेखेचा प्रवास उलगडतो जो आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘मटका’ नावाचं धाडसी जुगार साम्राज्य उभं करतो आणि श्रीमंतांचा छंद संपूर्ण देशाच्या वेडात रूपांतरित करतो. मात्र या यशाच्या मागे मोठे धोके, संघर्ष आणि विनाशाची शक्यता दडलेली असल्याचंही ट्रेलर सूचित करतो.

युद्धाच्या सावटातही ‘ठरलं तर मग’ ठरतेय चाहत्यांची पहिली पसंत, स्टार प्रवाहच्या मालिकेची जगभर चर्चा

या मालिकेत विजय वर्मासोबत कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, गुलशन ग्रोवर, गिरीश कुलकर्णी, भारत जाधव आणि जेमी लीवर यांसह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या भल्यामोठ्या स्टारकास्टमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. ट्रेलरमधील दृश्यरचना, संवाद आणि काळाचा अचूक आविष्कार प्रेक्षकांना १९६० च्या बॉम्बेच्या जगात घेऊन जातो. जलद गती, नाट्यमय वळणं आणि सत्तेच्या खेळात अडकलेल्या व्यक्तिरेखा यामुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची चिन्हं दिसत आहेत.

 

विजय वर्मा यांनी या भूमिकेबद्दल सांगितले की, ‘मटका किंग’मध्ये काम करणं हा एक रोमांचक आणि आव्हानात्मक अनुभव होता. या व्यक्तिरेखेत शिरताना त्यांना त्या काळातील वास्तव आणि मानसिकता समजून घेण्याची संधी मिळाली. तर कृतिका कामरा हिने तिची भूमिका वेगळी आणि सशक्त असल्याचे सांगत ही कथा मोठ्या स्वप्नांची असल्याचं नमूद केलं.

‘तुंबाडची मंजुळा’चा रहस्यमय टीझर रिलीज; भल्यामोठ्या स्टारकास्टने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

दरम्यान, सई ताम्हणकर हिने साकारलेली ‘बरखा’ ही व्यक्तिरेखा साधी वाटली तरी ती स्वतंत्र विचारांची आणि ठाम निर्णय घेणारी महिला असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या मालिकेला भव्यतेसह वास्तववादी कथा म्हटलं असून, बदलत्या बॉम्बेच्या पार्श्वभूमीवर ओळख आणि सन्मानाच्या शोधाची ही कहाणी असल्याचं सांगितलं. तर नागराज मंजुळे यांनी ‘मटका किंग’ ही केवळ कालखंडावर आधारित कथा नसून स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचा प्रवास असल्याचं अधोरेखित केलं.

‘मटका किंग’ ही बहुप्रतीक्षित मालिका १७ एप्रिलपासून भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार असून, या मालिकेमुळे प्रेक्षकांना एक वेगळा आणि थरारक अनुभव मिळणार आहे. तसेच ‘मटका किंग’ ही वेब सीरिज पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Matka king trailer release vijay varma nagraj manjule web series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम
1

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
2

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
3

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
4

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.