बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या फोटोमुळे चर्चेत आहे. तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि सुरेख दिसत आहे. अभिनेत्रीने आतापर्येंत प्रत्येक चित्रपटामध्ये उत्तम काम करून चाहत्यांची मन जिंकली आहेत. दरम्यान अभिनेत्रीचे या शेअर केलेल्या पोस्टला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मृणाल ठाकूरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तसेच सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते आणि नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
धुळ्याच्या मृणाल ठाकूरचं आरस्पानी सौंदर्य; नेटकऱ्यांचं जिंकलं मन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मृणालने शेअर केलेल्या फोटोमध्ये जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. अभिनेत्री या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
मृणालने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाचा ड्रेसवर तिने मॅचिंग ओढणी देखील घेतली आहे. तसेच अभिनेत्रीचा देसी लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
मृणालने जांभळ्या रंगाचा ड्रेसवर साधा आणि आकर्षित मेकअप केला आहे ज्यामध्ये जाड भुवया, आयलायनर आणि न्यूड गुलाबी लिपस्टिकचा वापर केले आहे.
मृणालने जांभळ्या रंगाचा ड्रेसवर आकर्षित ज्वेलरी देखील परिधान केल्या आहेत. गळ्यात डायमंन नेकलेस, हातात कडा आणि अभिनेत्रीच्या डायमंन इअरिंगने मन जिंकले आहे.
अभिनेत्रीने प्रत्येक फोटोमध्ये हटके अंदाजात पोज देऊन फोटो शेअर केले आहे. तसेच तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या कंमेंटचा वर्षाव होत आहे.