World Championship : विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताचा सुवर्णवेध! मनू भाकर, ईशा सिंह आणि दिव्या यांची ऐतिहासिक कामगिरी, सौजन्य : आयएएनएस
आयएसएसएफ विश्व नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत (World Championship) भारतीय नेमबाजांनी दमदार कामगिरी करत देशाच्या पदकतालिकेत आणखी दोन पदकांची भर घातली. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात ईशा सिंह, मनू भाकर आणि दिव्या थाडिगोल सुब्बाराजू यांच्या त्रिकुटाने सुवर्णपदकावर नाव कोरले. तर पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, अखिल श्योराण आणि नीरज कुमार यांनी कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले.
दोहा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात भारतीय संघाने एकूण १७६१-६८एक्स गुणांची कमाई केली. भारतीय नेमबाजांनी सुरुवातीपासूनच अचूक निशाणा साधत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. कोरियाच्या संघाने १७४८-६६एक्स गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर व्हिएतनामने १७४५-५४एक्स गुणांसह कांस्यपदक पटकावले.
भारतीय संघाकडून ईशा सिंहने सर्वाधिक ५९०-२५एक्स गुणांची नोंद केली. मनू भाकरने ५८७-२४एक्स, तर दिव्या थाडिगोल सुब्बाराजूने ५८४-१९एक्स गुणांचे योगदान दिले. या कामगिरीच्या जोरावर ईशा आणि मनू यांनी वैयक्तिक अंतिम फेरीतही स्थान मिळवले.
मात्र, वैयक्तिक अंतिम फेरीत दोघींनाही पदकाने हुलकावणी दिली. मनू भाकरने २७ हिट्ससह चौथे स्थान मिळवले, तर ईशा सिंह ११ हिट्ससह आठव्या क्रमांकावर राहिली. सांघिक सुवर्णपदकानंतर वैयक्तिक प्रकारातही पदक मिळवण्याची संधी दोघींना होती; मात्र त्यांचे आव्हान अंतिम फेरीत संपुष्टात आले.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात भारतीय नेमबाजांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, अखिल श्योराण आणि नीरज कुमार यांच्या भारतीय संघाने एकूण १७५१-९१एक्स गुण मिळवत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.
या स्पर्धेत चेक प्रजासत्ताकने १७५४-९२एक्स गुणांसह सुवर्णपदक जिंकले. नॉर्वेने १७५२-८१एक्स गुणांसह रौप्यपदक मिळवले. भारताकडून ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने ५८७-३३एक्स गुणांची नोंद केली. नीरज कुमार आणि अखिल श्योराण या दोघांनी अनुक्रमे ५८२-३१एक्स आणि ५८२-२७एक्स गुण मिळवले.
IND Vs NZ: न्यूझीलंडची चिंता वाढणार! Rishabh Pant ला मैदानात परतणार? फिटनेस टेस्टमध्ये…
या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी यापूर्वीही पदकांची कमाई केली आहे. गुरुवारी झालेल्या पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात जयपाल मालवीयने दबावाखाली उत्कृष्ट संयम दाखवत रौप्यपदक पटकावले होते. तसेच महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात मनू भाकर, सुरुची इंदर सिंह आणि संयम यांच्या संघाने रौप्यपदक मिळवले होते.
भारतीय महिला संघाने या प्रकारात एकूण १७३८ गुण मिळवले. यामध्ये ६१ इनर-१० गुणांचा समावेश होता. मनू भाकरने ५८३-२१एक्स गुणांसह भारतीय संघाचे नेतृत्व केले. तिच्या चौथ्या मालिकेत तिने १०० गुणांची अचूक कामगिरी केली. सुरुचीने ५८०-२४एक्स, तर ज्युनियर विश्वविजेती संयमने ५७५-१६एक्स गुणांचे योगदान दिले.
भारताचा दणका! Under-19 Asia Cup च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश; पाकिस्तानची होणार महामुकाबला?
या प्रकारात चीनने १७४५-६५एक्स गुणांसह सुवर्णपदक, तर दक्षिण कोरियाने १७२९-४९एक्स गुणांसह कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात मात्र भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. भारताने १७३०-५८एक्स गुणांसह सातवे स्थान मिळवले. जयपाल मालवीयने ५८५-२३एक्स गुणांसह वैयक्तिक पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान, भारतीय नेमबाज ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा मैदानात उतरणार आहेत. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराची अंतिम फेरी होणार असून, त्याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पदकांची संख्या वाढवण्याची भारताला आणखी एक संधी मिळणार आहे.
Ans: भारताने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
Ans: ईशा सिंह, मनू भाकर आणि दिव्या थाडिगोल सुब्बाराजू यांचा भारतीय संघात समावेश होता.
Ans: ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, अखिल श्योराण आणि नीरज कुमार यांच्या संघाने कांस्यपदक जिंकले.






