
फोटो सौजन्य - Social Media
The Legend Of Karna : कर्णाच्या जीवनावर आधारित ऍनिमेटेड सिरीज! कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार?
देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरु झालेले आंदोलनाचे पडसाद मुंबईतही दिसू लागले आहे. मुंबईतील विद्यार्थी आपल्या शिक्षणव्यवस्थेत सुधार व्हावा या हेतूने रस्त्यावर उतरले आहेत आणि आंदोलने करत आहेत. अशामध्ये aayesha khan पोलिसांच्या ताब्यात असणे याचा थेट संबंध या विद्यार्थी आंदोलनाशी आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते की, “मी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि या आंदोलनाचा एक भाग होण्यासाठी आज मुंबईत दादर येथे होत असलेल्या विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेण्याचे ठरवले. मी दादर येथे पोहचले तेव्हा मी आणि माझे मित्र शांतपद्धतीने उभे असताना आमच्याकडे पोलीस आले. त्यांनी आम्हाला सांगितले की इथे आंदोलन करू नका. आम्ही लोकांनी तसंही आतापर्यंत काही सुरुवातही नव्हती केली होती. आम्ही आमच्या मित्रांची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे होतो. आम्ही पोलिसांना विचारलं की आंदोलन नाही तर दुसरा काही पर्याय आहे का? तितक्यात त्या पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने पकडून त्यांच्या व्हॅनमध्ये नेण्यास सुरुवात केली. आम्हाला ओढूनताडून कसलीही चूक नसताना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आता आम्ही वरळी पोलीस स्थानकात आहोत.”
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचे ‘व्यसनखंडीनी’ रूप; व्यसनमुक्तीचा देणार शक्तिशाली संदेश
आयेशा खानसाठी सरसावली तरुणमंडळी!
आयेशा खानने सोशल मीडिया पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी तिच्या कामगिरीसाठी तसेच विचारांसाठी तिचे मनभरून कौतुक केले आहे. तसेच तरुणांचा विचार केल्यामुळे तरुण मंडळीने तिचे आभार मानले आहेत.