(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Akshay Kumar ला ‘धुरंधर’ मध्ये काम करण्याची मिळाली होती संधी? अभिनेत्याने अखेर केला खुलासा
धर्मेंद्र यांना बाफ्टा पुरस्कारांमध्ये देखील सन्मानित करण्यात आले आणि त्यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. परंतु, २०२६ च्या अकादमी पुरस्कारांमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला नाही. यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धर्मेंद्र व्यतिरिक्त, ऑस्कर २०२६ मध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सना सन्मानित करण्यात आले, ज्यात चित्रपट निर्माते रॉबर्ट रेडफोर्ड, डायन कीटन, कॅथरीन, रॉब रेनर, रॉबर्ट डुव्हल, जेक हॅकमन आणि व्हॅल किल्मर यांचा समावेश आहे. २०२६ च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये या कलाकारांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची देखील दखल घेण्यात आली.
या भारतीय कलाकारांना ऑस्करमध्ये सन्मानित केले
२०२६ च्या ऑस्करमध्ये धर्मेंद्र यांना सन्मानित करण्यात आले नव्हते. परंतु, त्यांच्यापूर्वी अनेक भारतीय स्टार्सना सन्मानित करण्यात आले आहे. या यादीत नितीन चंद्रकांत देसाई, इरफान खान, भानू अथैया, श्रीदेवी आणि शशी कपूर यांचा समावेश आहे. त्यामुळे, लोकांना आशा होती की धर्मेंद्र यांनाही २०२६ च्या ऑस्करमध्ये सन्मानित केले जाईल. परंतु असे काहीही झाले आणि आणि आता चाहत्यांचा संताप झाला आहे.
धर्मेंद्र यांनी या चित्रपटाद्वारे केले पदार्पण
धर्मेंद्र यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत “फूल और पत्थर,” “शोले,” “सीता और गीता,” आणि “अनुपमा” सारख्या चित्रपटांसह अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दिग्गज अभिनेते जरी आता आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणार आहे.






