Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियाला ‘उलटीचा पॉट’ म्हणत Paresh Rawal यांनी केली टीका; ‘धुरंधर 2’ वादामुळे रंगली चर्चा

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यावेळीही त्यांनी तेच केले, सोशल मीडियाला 'उलटीचा पॉट' म्हटले. काही दिवसांपूर्वीच 'धुरंधर'मुळे अभिनेत्यावर टीका केली जात आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2026 | 11:36 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियाला ‘उलटीचा पॉट’ म्हणाले परेश रावल
  • ‘धुरंधर 2’ वादामुळे अभिनेता अडचणीत
  • सोशल मीडियावर केली टीका
 

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियावर वाढणाऱ्या नकारात्मकतेवर भाष्य केले आणि लोकांना ऑनलाइन काय पोस्ट करायचे आहे याबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी सोशल मीडियाची तुलना ‘उलटीच्या पॉटशी’ केली आणि त्यांच्या मते नेटकरी अनेकदा विचार न करता कठोर मते कशी व्यक्त करतात हे स्पष्ट केले.

आपले मत मांडताना त्यांनी सोशल मीडियाची तुलना ‘उलटीचा पॉट’ म्हणत केली. आणि सांगितले की, अनेक युजर्स विचार न करता कठोर मत व्यक्त करतात. पीटीआयशी बोलताना त्यांनी म्हटलं, “मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मते, सोशल मीडिया हा उलटी करण्याच्या भांड्यासारखा आहे. तिथे काहीही बोलले जाते. असं होऊ नये. नकारात्मकता पसरू नये. कोणाबद्दलही काहीही बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही.” असे त्यांनी म्हटले आहे.

‘Dhurandhar 2’ चा 19 व्या दिवशीही ऐतिहासिक विक्रम; ₹1000 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला चित्रपट

सोशल मीडियावर बोलताना परेश रावल यांनी पुढे सांगितले की, ऑनलाईन पसरत असलेली द्वेषपूर्ण प्रतिक्रिया कधी-कधी त्यांच्यावर परिणाम करते, पण तरीही ते स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी म्हटलं, “कधी कधी मला खूप राग येतो, पण तरीही मी एक मर्यादा पाळतो. मी कधीही शिवीगाळ करत नाही. सोशल मीडिया हा सकारात्मकता पसरवण्यासाठी उत्तम माध्यम आहे. जर नकारात्मकता असेल, तर त्यापासून दूर राहा.”

‘धुरंधर’वरील टीकेनंतर अडकले वादात

अलीकडेच ‘धुरंधर’ चित्रपटावर टीका करणाऱ्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिल्यानंतर परेश रावल ऑनलाईन वादात सापडले होते. एका रेडिओ जॉकीने X (ट्विटर) वर एक रील शेअर केली होती, ज्यात दोन जण चित्रपटावर विनोदी पद्धतीने कमेंट करत होते. त्या क्लिपला “हाहाहा… ‘धुरंधर’ची सर्वोत्तम समीक्षा!” असे कॅप्शन देण्यात आले होते.

ही पोस्ट लवकरच चर्चेत आली, त्यानंतर परेश रावल यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं, “मूर्ख रिपोर्टर म्हणून तुझी नोकरी पक्की आहे. कुणालाही हे नको आहे.” त्यांच्या या कमेंटवर आरजेने लगेचच उत्तर देत त्यांना दुरुस्त केलं आणि पलटवार करत म्हटलं, “तुमचे तथ्य आधी बरोबर करा. मी रिपोर्टर नाही. तुम्ही फक्त एक अभिनेता आहात, खऱ्या आयुष्यात आपल्या कलेपासून खूप दूर.”

‘हास्यजत्रा’ फेम Gaurav More ने केलं गुपचूप लग्न; नवीन घरासोबत चाहत्यांना दिली डबल गुडन्यूज

‘धुरंधर’च्या कौतुकातही व्यक्त केले मत

दरम्यान, अभिनेते परेश रावल यांनी ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दलही आपलं मत मांडलं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, “मी ‘धुरंधर’ने खूप प्रभावित झालो आहे. मला हा चित्रपट खूप आवडला. अजूनही मी त्यातून बाहेर आलो नाही. मी पहिला ‘धुरंधर’ दोन वेळा आणि ‘धुरंधर 2’ही दोन वेळा पाहिला आहे. पुन्हा एकदा पाहावंसं वाटतंय.” असे त्यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Paresh rawal calls social media puking pot after heated argument over dhurandhar 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया
1

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण
2

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट
3

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.