Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaswinder Bhalla: प्रसिद्ध कॉमेडियन जसविंदर भल्ला यांचे निधन, अनेक पंजाबी चित्रपटांमधून केले प्रेक्षकांचे मनोरंजन

पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग असलेल्या जसविंदर भल्ला यांच्या निधनाने पंजाबी इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. जसविंदर भल्ला यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 22, 2025 | 10:53 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रसिद्ध कॉमेडियन जसविंदर भल्ला यांचे निधन
  • वयाच्या ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • जसविंदर भल्ला यांची संपूर्ण कारकीर्द

प्रसिद्ध पंजाबी विनोदी अभिनेता जसविंदर भल्ला यांचे निधन झाल्याने आहे. या दुःखद बातमीने संपूर्ण पंजाबी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झालेले जसविंदर भल्ला यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये अनेक हिट आणि मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. उद्या शनिवारी त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तसेच आता चाहते आणि अनेक मोठमोठे कलाकार त्यांचा श्रद्धांजली वाहत आहेत. जसविंदर भल्ला त्यांच्या कारकिर्दीत कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे जाणून घेऊयात.

Vishwambhara Teaser: चिरंजीवीने पूर्ण केले वचन; वाढदिवसापूर्वीच चाहत्यांना दिले ‘हे’ खास गिफ्ट!

पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते
जसविंदर भल्ला यांचा जन्म ४ मे १९६० रोजी लुधियाना येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. जसविंदर भल्ला हे सुशिक्षित होते. पंजाब कृषी विद्यापीठातून बीएससी आणि एमएससी केल्यानंतर त्यांनी चौधरी चरण सिंग पदव्युत्तर महाविद्यालय, मेरठ येथून पीएचडी पदवी देखील मिळवली. जसविंदर भल्ला यांनी पंजाब कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक, नंतर प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख म्हणून काम केले. २०२० मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले.

‘छनकटा’ या विनोदी मालिकेने कारकिर्दीला सुरुवात
जसविंदर भल्ला यांनी १९८८ मध्ये ‘छनकटा’ या ऑडिओ कॅसेटने विनोदी कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर या मालिकेच्या २७ हून अधिक ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट प्रदर्शित झाल्या. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये ‘दुल्ला भाटी’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये ते ‘महौल ठीक है’ मध्ये इन्स्पेक्टर जसविंदर भल्लाच्या भूमिकेत दिसले आणि येथून त्यांना ओळख मिळाली. प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले.

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी

अनेक सुपरहिट पंजाबी चित्रपटांचा समावेश
भल्ला यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘जिने मेरा दिल लुटिया’, ‘जट्ट अँड ज्युलिएट’, ‘कॅरी ऑन जट्टा’, ‘सरदारजी’, ‘पॉवर कट’, ‘मुंडे कमल दे’, ‘किट्टी पार्टी’ आणि ‘कॅरी ऑन जट्टा ३’ यासारखे सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. दिलजीत दोसांझसारख्या बड्या स्टार्ससोबतही त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. जसविंदर भल्ला यांनी आता जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांची संपूर्ण कारकीर्द प्रेक्षकांच्या मनात राहणार आहे.

Web Title: Punjabi comedian jaswinder bhalla dies at 65 he starts his career from audio cassette was part of many movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Punjab

संबंधित बातम्या

Punjab News : नवज्योत सिंग सिद्धू राजकारणात ‘कमबॅक’ करणार? दिल्लीत प्रियंका गांधी यांची घेतली भेट
1

Punjab News : नवज्योत सिंग सिद्धू राजकारणात ‘कमबॅक’ करणार? दिल्लीत प्रियंका गांधी यांची घेतली भेट

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण
2

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण

करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करणार हिना खान, पती रॉकीच्या नावाची लावली मेहंदी; शेअर केले फोटो
3

करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करणार हिना खान, पती रॉकीच्या नावाची लावली मेहंदी; शेअर केले फोटो

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल
4

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.