Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नमस्कार, कसं काय मुंबईकर…” अल्लू अर्जुनने मुंबईकरांसोबत साधला मराठीत संवाद; पाहा VIDEO

मुंबईत ‘पुष्पा २ द रूल’चं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता अल्लू अर्जुन आला होता. मुंबईत येताच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमात चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलंय.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 30, 2024 | 02:51 PM
'पुष्पा' ते 'रेस गुर्रम' पर्यंत हे आहेत अल्लू अर्जुनचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

'पुष्पा' ते 'रेस गुर्रम' पर्यंत हे आहेत अल्लू अर्जुनचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘पुष्पा २’ मुळे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेत आहे. देशभरात दोघंही सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अल्लू अर्जुनने आतापर्यंत चेन्नई, कोची आणि पटनासारख्या शहरात प्रमोशन केलं असून तो नुकताच मुंबईत ‘पुष्पा २ द रूल’चं प्रमोशन करण्यासाठी आला होता. मुंबईत येताच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमात चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलंय. सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन मुंबईत आल्यानंतर मराठी बोलल्यानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ED च्या छाप्यानंतर राज कुंद्राची पहिली प्रतिक्रिया, शिल्पा शेट्टीचा पती पोर्नोग्राफी प्रकरणी काय म्हणाला?

अल्लू अर्जुनचा मराठी बोलत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ ‘सिनेब्लूज’ने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेला आहे. ‘पुष्पा २ द रूल’चं प्रमोशन करण्यासाठी चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुंबईत चित्रपटाचं प्रमोशन करायला आला होता. याच वेळी झालेल्या एका कार्यक्रमात अल्लू अर्जुनचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान, व्यासपीठावर येताच अभिनेत्याने उपस्थितांशी मराठीत संवाद साधयला सुरूवात केला. मुंबईतल्या प्रमोशनदरम्यानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन स्टेजवर येतो तेव्हा निवेदक त्याचं स्वागत करतात. तुम्ही इथल्या लोकांशी काही तरी संवाद साधावा, अशी विनंती निवेदकाने अभिनेत्याकडे केली.

अल्लू अर्जुन स्टेजवर येताच हाती माईक घेतो आणि सर्वांना “नमस्कार” असं बोलून मान खाली करून अभिवादन करतो. उपस्थित लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. त्यानंतर पुढे अल्लू अर्जुन “कसं काय मुंबईकर” असं म्हणतो. पुन्हा लोक टाळ्या वाजवतात. अल्लू अर्जुनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. त्याच्या मराठीने मुंबईकरांच्या मनावर राज्य केले आहे. अल्लू अर्जुन काही पहिल्यांदाच यावेळी मराठीमध्ये बोललेला नाही. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा द राईज’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळेही अभिनेत्याने मराठीमध्ये संवाद साधला होता. ‘पुष्पा द राईज’चित्रपटाला फक्त देशातच नाही तर परदेशातही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने ३९० ते ३९४ कोटींपर्यंतची एकूण कमाई केली आहे.

‘या’ स्टार स्पर्धकांची लोकप्रियता झाली कमी, सोशल मीडियावर प्रेक्षकांनी सांगितली कारणं

अ‍ॅक्शन-ड्रामा असणाऱ्या ‘पुष्पा द रुल’चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करच असून आणि पहिल्याही भागाचं दिग्दर्शन त्यांनीच केलं आहे. ‘पुष्पा द रुल’चित्रपट येत्या ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट २०२४ मधील सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाने आतापर्यंत ओटीटी राईट्स, प्री बुकिंग आणि टेलिव्हिजन राईट्समधून चित्रपटाचं प्रदर्शन होण्याआधी जबरदस्त कमाई केलेली आहे.

Web Title: Pushpa 2 the rule movie during promotion allu arjun speaks marathi see mumbai viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Mumbai
  • Pushpa 2: The Rule
  • tollywood movie

संबंधित बातम्या

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका
1

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
2

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
3

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
4

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.