Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

९ वर्षाची नाराजी अखेर संपली; सलमान आणि अरिजीत आले एकत्र, वादाचं नेमकं कारण काय ??

सलमान खान आणि अरिजीत सिंग यांच्यातील जुना वाद अखेर मिटला आहे. आणि ९ वर्षांचे वैर संपले आहे. २०१४ मध्ये या दोघांमध्ये कोणत्या कारणामुळे वाद निर्माण झाला होता आणि आता तो कसा मिटला हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 29, 2025 | 05:01 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांच्यातील वर्षानुवर्षेच्या मतभेदानंतर, आता दोघेही पुन्हा एकत्र आले आहेत. ‘सिकंदर’ चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके बिना’ या नवीन गाण्यात अरिजीतचा आवाज ऐकू आला, ज्यामुळे या दोघांमधील ९ वर्षांचे वैर आता मैत्रीत बदलले आहे हे स्पष्ट झाले आहे. पण दोघांमधील वाद इतका काळ का टिकला आणि तो कसा संपला? हे आपण आता जाणून घेणार आहोत.

रणवीर अलाहाबादियानंतर स्वाती सचदेवाने ओलांडल्या कॉमेडीच्या मर्यादा, स्वतःच्याच आईवर केला अश्लील विनोद!

२०१४ मध्ये स्टार गिल्ड अवॉर्ड्स दरम्यान हा वाद सुरू झाला. हा शो सलमान खान आणि रितेश देशमुख यांनी होस्ट केला होता आणि याच काळात अरिजीत सिंगला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला. जेव्हा अरिजीत स्टेजवर पोहोचला तेव्हा सलमानने गमतीने विचारले- ‘तुम्हाला झोप लागली का?’ यावर अरिजीतने उत्तर दिले- ‘तुमच्या होस्टिंगमुळे माझी झोप उडाली.’ सलमानला हे उत्तर आवडले नाही. तो गमतीने म्हणाला, ‘तुम्ही गाणी गाता त्यामुळे तर मला झोप यते!’. त्यानंतर सलमानने अरिजीतला त्याचे ‘तुम ही हो’ हे हिट गाणे गाण्यास सांगितले. जेव्हा अरिजीतने गाणे सुरू केले तेव्हा सलमानने त्याची नक्कल करून त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. यानंतर दोघांमधील अंतर वाढत गेले. आणि यानंतर अरिजीत आणि सलमान खान यांच्यात वाद झाल्याचे दिसून आहे.

सलमानने ‘सुलतान’मधून अरिजीतचे गाणे काढून टाकले
या वादानंतर २०१६ मध्ये सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटात अरिजीतने गायलेले एक गाणे समाविष्ट करण्यात आले. पण वृत्तानुसार, सलमानने स्वतः ते गाणे काढून टाकले आणि नंतर ते राहत फतेह अली खान यांनी गायले. यादरम्यान, अरिजीतने फेसबुकवर सलमानची माफी मागितली, परंतु नंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. अरिजीतने सलमानला माफ करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, पण सलमानचा राग शांत झाला नाही आणि दोघांमधील संभाषण थांबले.

पुन्हा प्लॅस्टिक सर्जरी केली का ? मौनी रॉयचा नवा लूक पाहून नेटकरी बुचकळ्यात…

९ वर्षांनंतर वाद संपला
सलमान आणि अरिजीतमधील ही दरी ९ वर्षे चालू राहिली, पण २०२३ मध्ये ‘टायगर ३’ दरम्यान दोघांमध्ये अखेर समेट झाला. या चित्रपटात अरिजीत सिंगने ‘लेके प्रभु का नाम’ आणि ‘रुआन’ सारखी गाणी गायली, जी सुपरहिट ठरली. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच अरिजीत पुन्हा सलमानसाठी गाणे गाताना दिसला. ‘टायगर ३’ नंतर, सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटातही अरिजित सिंगचा आवाज ऐकू येणार आहे. ‘हम आपके बिना’ या चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे.

Web Title: Salman arijit controversy end 9 year old feud gave voice to sikander song hum aapke bina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Arijit SIngh
  • Famous Singer
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Corona Virus : गायक जान कुमार सानूला Coronaची लागण; हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेअर करत दिली हेल्थ अपडेट
1

Corona Virus : गायक जान कुमार सानूला Coronaची लागण; हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेअर करत दिली हेल्थ अपडेट

काय आहे Thumpn स्टार्टअप? Arijit Singh पासून Badshah पर्यंत मोठ्या सिंगर्सनी लावलेत पैसे; काय होणार फायदा?
2

काय आहे Thumpn स्टार्टअप? Arijit Singh पासून Badshah पर्यंत मोठ्या सिंगर्सनी लावलेत पैसे; काय होणार फायदा?

धुरंधर’फेम गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच साखरपुड्याची केली घोषणा, स्टेजवरच होणाऱ्या पतीसाठी व्यक्त केलं प्रेम, VIDEO व्हायरल
3

धुरंधर’फेम गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच साखरपुड्याची केली घोषणा, स्टेजवरच होणाऱ्या पतीसाठी व्यक्त केलं प्रेम, VIDEO व्हायरल

Famous Singer Death : संगीत क्षेत्राची ‘अम्मा’ काळाच्या पडद्याआड! युगाचा अंत, 50 हजार गाण्यांची यादी; S Janaki यांचे निधन
4

Famous Singer Death : संगीत क्षेत्राची ‘अम्मा’ काळाच्या पडद्याआड! युगाचा अंत, 50 हजार गाण्यांची यादी; S Janaki यांचे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.