पुन्हा एकदा सलमानच्या मानवतेची झलक, 200 मुलांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी भरवले नाशिकमध्ये मोफत शिबीर
बॉलीवूड स्टार सलमान खान जामनगरमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी अंबानी कुटुंबात सामील झालेला दिसला. सलमानने आपल्या खास स्टाइलमध्ये कार्यक्रमात ग्रँड एन्ट्री केली होती. तसेच कार्यक्रमाच्या उत्साहात भर घालताना, अभिनेता त्याचा प्रसिद्ध हिट ट्रॅक “ओह ओह जाने जाना” गाणं गाताना दिसला. ज्यामध्ये त्याचा डॅशिंग लुक दिसून येत आहे. तसेच हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल आहे. या व्हिडीओ चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.
भाईजानने गायले ‘ओह ओह जाने जाना” गाणं
या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये सलमान कोकिलाबेन अंबानींसह सर्वांना हात जोडून अभिवादन करताना दिसत आहे. आणखी एका हृदयस्पर्शी क्षणात, नीता अंबानीची आई पूर्णिमा दलाल सलमानला मिठी मारताना आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसल्या. क्लिपमध्ये सलमान श्लोका अंबानीसोबत बोलताना दिसत आहे. इव्हेंटमधील दुसऱ्या व्हिडिओमध्ये, सलमान मायक्रोफोन धरून “ओह ओह जाने जाना” गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
Anurag Kashyap: दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याची केली घोषणा, काय आहे नक्की कारण?
Latest: Megastar Salman Khan vibing to “Oh Oh Jane Jana” in Jamnagar with the Ambanis! @BeingSalmanKhan #SalmanKhan pic.twitter.com/7hns8RZdA4
— SALMAN KI SENA™ (@Salman_ki_sena) December 30, 2024
जामनगरमध्ये वाढदिवस केला साजरा
सलमान खान आणि अनंत अंबानी यांच्यात खूप घट्ट नाते असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी, सलमानने जामनगरमध्ये ५९ वा वाढदिवस साजरा केला, ज्यात त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित झाले होते. अंबानी कुटुंबाने या भव्य समारंभाचे आयोजन केले होते, ज्यात सलमानच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याची बहीण अर्पिता खान, मेव्हणा आयुष शर्मा, त्याची आई सलमा खान आणि हेलन उपस्थित होते. हा वाढदिवस अगदी एखाद्या सोहळ्यासारखा साजरा झाला.
या चित्रपटात दिसणार आहे
वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर दबंग अभिनेता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसोबत मॉलमध्ये गेले. मॉलमध्ये जमलेल्या चाहत्यांनी सलमानला ओवाळले. तसेच अभिनेता आता एआर मुरुगदोस दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मित ‘सिकंदर’ या आगामी चित्रपटात पुढे दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर सारखे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच टीझर लाँच झाले होते ज्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.