
Bepanwah Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यशराज फिल्म्सने आज आपल्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली असून, या चित्रपटाचे नाव ‘बेपरवाह’ असे आहे. अहान पांडे आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या रोमँटिक ॲक्शन-ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत, तर आदित्य चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. Bepanwah Movie:
अहान पांडे हा ‘सैयारा’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झाला. त्या चित्रपटाने त्याला घराघरात पोहोचवलं. आता ‘सैयारा’ नंतर तो थेट यशराज सारख्या मोठ्या बॅनरमध्ये एन्ट्री करत आहे. त्याच्यासोबत शर्वरी आहे, जिने तिच्या अभिनयाने आधीच सगळ्यांना इम्प्रेस केलं आहे. दोघांची केमिस्ट्री कशी असेल याची सगळ्यांना उत्सुकता असूव हा चित्रपट रोमँटिक ॲक्शन-ड्रामाने भरलेला त्याचअर्थ प्रेमासोबत ॲक्शन पण बघायला मिळणार मिळेल.
या चित्रपटाची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा कमबॅक आहे. कारण याआधी त्यांनी ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ सारखे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट यशराज फिल्मला दिले होते. आता बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा एकदा आदित्य चोप्रा सोबत काम करत आहेत, त्यामुळे अपेक्षा खूप जास्त आहेत. अली अब्बास जफरला मोठ्या स्केलचे चित्रपट बनवण्यात हातखंडा आहे आणि ‘बेपरवाह’ पण त्याच पद्धतीचा भव्य चित्रपट असणार आहे.
मेकर्सनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पण जाहीर केली आहे. ‘बेपरवाह’ हा चित्रपट 26 मार्च 2027 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांना अजून पाच महिने वाट पाहावी लागणार आहे. टायटल टीझर पोस्टरवरून चित्रपट रोमँटिक आणि इंटेन्स असल्याचे दिसतयं. या सिनेमासाठी आदित्य चोप्रा यांनी खूप मेहनत घेतली असं म्हटले जात असून यशराज फिल्म्सचा हा 2027 मधला सगळ्यात मोठा चित्रपटांपैकी एक असेल.
अहान आणि शर्वरी या नव्या जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर तर ‘बेपरवाह’ चा पोस्टर आल्यापासूनच ट्रेंडिंग सुरू आहे. आता येत्या काही दिवसात या चित्रपटाचा टीझर आणि गाणी पण येतील, तेव्हा धमाका अजून वाढणार आहे.
Ans: अली अब्बास जफर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
Ans: आदित्य चोप्रा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
Ans: ‘बेपरवाह’ हा रोमँटिक ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे.