Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?

शाहरुख खान आता त्याच्या कुटुंबासह मन्नत सोडून भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. हे अचानक का घडत आहे? याचे कारण काय आहे? हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 26, 2025 | 05:04 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याचा ‘मन्नत’ बंगलाही तितकाच लोकप्रिय आहे. कोणताही सण असो किंवा शाहरुख खानचा वाढदिवस असो, मन्नतच्या बाहेर चाहत्यांची गर्दी दिसून येते. लोक जेव्हा मुंबईला येतात तेव्हाही ते शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी मन्नतच्या बाहेर नक्कीच एक फेरी मारतात. आता या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. शाहरुख खान आता मन्नत सोडून त्याच्या कुटुंबासह दुसरीकडे जाणार आहे.

Aman Verma Divorce : गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना लोकप्रिय अभिनेत्याचा काडीमोड; नऊ वर्षाचा संसार मोडला

शाहरुख खान मन्नत सोडून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणार
शाहरुख खान आता मन्नत सोडत आहे हे वाचून अनेक चाहत्यांना धक्का बसला असेल. शाहरुख खान आता त्याच्या कुटुंबासह हा आलिशान बंगला सोडून भाड्याच्या घरात राहणार आहे, हे ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की खान परिवारासह पाली हिल परिसरात स्थलांतरित होणार आहे आणि अभिनेत्याने वाशु भगनानी यांच्या आलिशान अपार्टमेंटचे ४ मजले भाड्याने घेतले आहेत. पूजा कासा इमारतीतील हे आलिशान अपार्टमेंट आहेत.

एका महिन्याचे भाडे ऐकून व्हाल चकित
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक मजल्यावर एक फ्लॅट आहे, पण तो मन्नतइतका मोठा नाही. तरीही, त्याच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी येथे पुरेशी जागा आहे. या फ्लॅट्सचे भाडे शाहरुख खान दरमहा सुमारे २४ लाख रुपये देणार आहे. तसेच, शाहरुख खानने मन्नत कायमची सोडली नाही तर तो तात्पुरता या ठिकाणी राहण्यासाठी गेला आहे.

Don 3 : रणवीर सिंगच्या ‘डॉन ३’ चित्रपटाचे शूटिंग या वर्षी होणार सुरू, फरहान अख्तरने केली पुष्टी!

शाहरुख खानने त्याच्या कुटुंबासह मन्नत सोडण्याचे कारण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, मन्नतमध्ये काही नूतनीकरण आणि विस्ताराचे काम करायचे आहे. ही सर्व कामे मे २०२५ पासून सुरू होतील आणि सुमारे २ वर्षे चालतील. अशा परिस्थितीत, मन्नतमध्ये काही नूतनीकरणाचे काम होईपर्यंत, खान कुटुंबाला दुसरीकडे कुठेतरी स्थलांतरित व्हावे लागणार आहे. मन्नत तयार होताच, शाहरुख त्याची पत्नी गौरी खान आणि त्यांच्या तीन मुलांसह येथे परतणार आहे.

Web Title: Shah rukh khan moving out of mannat with family reason revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
4

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.