(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय आसामी गायक जुबिन गर्ग यांचा सिंगापूरच्या सेंट जॉन्स बेटावरील पाण्यात पोहताना मृत्यू झाला. सुरुवातीला माध्यमांच्या वृत्तानुसार त्यांचा मृत्यू स्कूबा डायव्हिंग करताना झाला होता, परंतु आता पोलिसांनी स्पष्ट केले आहे की ते पोहताना बुडाले आहे. आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सत्य कारण काय आहे हे स्पष्ट झाले आहे. ज्यामध्ये नक्की काय सांगितले आहे जाणून घेऊयात.
राखी सावंत पुन्हा चर्चेत; म्हणाली, “बुर्ज खलीफामध्ये 4‑5 फ्लॅट्स, डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत!”
सिंगापूर पोलिस दलाने (एसपीएफ) जुबिन गर्ग यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि प्राथमिक तपासातील निष्कर्ष भारतीय उच्चायुक्तालयाला सादर केले आहेत. या प्रकरणात खून किंवा गुन्हेगारी हिंसाचाराचा कोणताही संशय नसल्याचे पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जुबिन गर्ग यांना १९ सप्टेंबर रोजी बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना ताबडतोब सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
मित्रांसोबत एका बोटीत होते सामील
वृत्तानुसार, १९ सप्टेंबर रोजी जुबिन गर्ग त्यांच्या मित्रांसोबत एका बोटीत सहभागी झाले होते. एका व्हिडिओमध्ये ते लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारताना दिसले होते. परंतु, नंतर त्यांनी जॅकेट काढून पुन्हा पाण्यात उडी मारली, ज्यामुळे हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आहे.
माधुरी दीक्षितने सीन नाकारला, दिग्दर्शक म्हणाले; “सीन कर नाहीतर चित्रपट सोड”
कार्यक्रम रद्द, संपूर्ण आसाममध्ये शोककळा
भारत-सिंगापूर राजनैतिक संबंधांची ६० वर्षे आणि भारत-आसियान वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित ईशान्य भारत महोत्सवात सहभागी होण्यासाठी जुबिन गर्ग सिंगापूरमध्ये होते. १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान होणारा हा भव्य कार्यक्रम त्यांच्या अकाली मृत्यूमुळे रद्द करण्यात आला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली.
मॅनेजर आणि आयोजकांना अटक
दरम्यान, आसाम पोलिसांनी गायकाचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंत यांना दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष हत्या, गुन्हेगारी कट आणि निष्काळजीपणाने मृत्यू घडवून आणणे यासारख्या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.