Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pushpa 3: दिग्दर्शक सुकुमारने केली ‘पुष्पा ३’ ची घोषणा, SIIMA अवॉर्ड्समध्ये चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

दुबईमधील आयोजित करण्यात आलेला SIIMA अवॉर्ड्स २०२५ यशस्वीरित्या पार पडला आहे. दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांच्या टीमने एकाच वेळी पाच प्रमुख श्रेणींमध्ये विजय मिळवला आहे. या विजयानंतर, सुकुमारने यांनी 'पुष्पा ३' ची घोषणा केली

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 07, 2025 | 02:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सुकुमारने केली ‘पुष्पा ३’ ची घोषणा
  • SIIMA अवॉर्ड्समध्ये ‘पुष्पा २’ ची हवा
  • ‘पुष्पा २’ च्या नावावर ५ पुरस्कार
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेला SIIMA अवॉर्ड्स २०२५ पूर्णपणे ‘पुष्पा २: द रुल’ या नावाने साजरा झाला होता. दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांच्या टीमने एकाच वेळी पाच प्रमुख श्रेणींमध्ये विजय मिळवला आहे. या विजयानंतर, सुकुमार यांनी स्टेजवरूनच घोषणा केली ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दिग्दर्शकाने ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’च्या निर्मितीला मान्यता दिली आहे. ही बातमी ऐकताच चाहते खूप आनंदी झाले आहेत.

‘पुष्पा २’ च्या नावावर ५ पुरस्कार
या कार्यक्रमादरम्यान, अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, रश्मिका मंदानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सुकुमार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, देवी श्री प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शंकर बाबू कंदुकुरी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे. या मोठ्या विजयानंतर, अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर लिहिले की, सलग तिसऱ्यांदा SIIMA पुरस्कार जिंकणे हा त्याच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्याने याचे श्रेय त्याच्या दिग्दर्शकाला, संपूर्ण टीमला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या चाहत्यांना दिले आहे.

Bigg Boss 19: मुनावर फारुकीने सलमान समोर अभिषेक बजाजला केले रोस्ट, म्हणाला ‘आवाज खूप करतो, पण काम…’

‘पुष्पा ३’ ची केली घोषणा
खरं तर पुरस्कार सोहळ्यादरम्यान, होस्टने गमतीने विचारले- ‘पार्टी नाहीये पुष्पा?’ यानंतर, प्रश्न आला की तिसरा भाग बनवला जाईल की नाही. सुकुमारने प्रथम अर्जुन आणि निर्मात्याकडे पाहिले आणि त्यांच्या हावभावावर हसत म्हणाला- ‘नक्कीच, पुष्पा ३ येत आहे.’ आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या बातमीने चाहते खूप आनंदी झाले आहे.

 

‘पुष्पा’ फ्रँचायझीचा आतापर्यंतचा प्रवास
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राईज’ने महामारीच्या काळात सुमारे ३५० कोटी रुपये कमाई करून वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनण्याचा विक्रम केला. त्यानंतर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २: द रूल’ने जगभरात १८७१ कोटी रुपये कमाई करून भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला. हा चित्रपट तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आणि अखिल भारतीय स्तरावर ‘दंगल’च्या मागे होता. चित्रपटातील अल्लू अर्जुनची पुष्पा राजची व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली.

गणपती विसर्जनानंतर अक्षय कुमारने केले असे काही की, युजर्सने केले कौतुक; म्हणाले ‘खिलाडी एक नंबर’

कथेचा पुढचा भाग काय असेल?
‘पुष्पा २’ एका मोठ्या अडचणीत संपला, ज्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला की कथा पुढे कुठे जाईल. दिग्दर्शक सुकुमार यांच्याकडे इतर चित्रपटांची रांग असल्याने आणि अल्लू अर्जुन सध्या दीपिका पदुकोणसोबत अ‍ॅटली यांच्या साय-फाय चित्रपटात काम करत असल्याने तिसरा भाग कदाचित येणार नाही अशी शंका अनेकांना होती. पण आता ‘पुष्पा ३’ च्या पुष्टीमुळे सर्व शंका दूर झाल्या आहेत. आणि या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Sukumar confirms pushpa 3 the rampage after pushpa 2 siima awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • pushpa 2

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.