(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा सुपरहिरो असतो आणि त्या बाबासाठी आपली लेक ही सर्वस्व असते. अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीचा फादर्स डे खूप छान साजरा झाला आहे. अभिनेत्यासोबत असं काहीतरी घडले की त्याने त्याच्या लेकीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करून तिचे खूप कौतुक केले आहे. फक्त स्वप्नील नाही तर संपूर्ण इंडस्ट्री स्वप्नीलची लेक मायराच कौतुक करताना दिसत आहे. तसेच आता अभिनेता स्वप्नीलच्या मागोमाग आता त्याची लेक मायराने देखील कलाविश्वात पदार्पण केले आहे.
अनेक कलाकार आणि त्यांची मुल या इंडस्ट्रीचा भाग होताना दिसत असतात. आता अश्यातच स्वप्नील जोशीची चिमुकली हिने एका गोड गाण्यातून या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. अवधूत गुप्ते याने स्वरबद्ध केलेल्या “सांग आई” या गाण्यात मायरा जोशीने अभिनय केला आहे. बाबाच्या पाऊलावर पाऊल ठेवत लेक देखील या मराठी इंडस्ट्रीचा भाग बनली आहे असे म्हणणे वावग ठरणार नाही.
‘तुझ्याशिवाय…’, अंकिता लोखंडेला आली Sushant Singh Rajput ची आठवण; सुंदर फोटो शेअर करत म्हणाली…
स्वप्नीलसाठी हा फादर्स डे नक्कीच या गाण्यामुळे खास झाला आहे. आणि या गाण्यात स्वतःच्या लेकीला पाहून नक्कीच अभिनेत्याला रिटर्न गिफ्ट देखील मिळालं आहे. स्वप्नील ने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहून मायराच भरभरून कौतुक देखील केलं आहे. स्वप्नीलने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. मायराच्या आवडी पोटी तिने केलेलं हे छोट काम पाहून मला खूप आनंद झाला आहे. हे तिचं सिने सृष्टीतील पदार्पण नाही पण तुम्ही सगळ्यांनी तिला जे प्रेम दिलं याबद्दल सगळ्यांचे आभार, आमच्या सगळ्यासाठी हा तिचा क्षण खूप मौल्यवान आहे. तिने तिच्या बाबा ला दिलेलं हे खास गिफ्ट आहे”, असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
स्वप्नीलने बाल कलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर आता लेकीला या खास गाण्यातून बघताना त्याला खूप आनंद होत आहे. प्रत्येक बापाला आपल्या लेकीने स्वतः साठी काही तरी करावं आणि वडिलांना त्याच्या अभिमान वाटेल आणि लोक त्यांचं कौतुक करतील असं वाटत असते. असेच काहीसे मायराने अगदी छोट्या वयात करून दाखवले आहे. येणाऱ्या काळात या बाप लेकीची जोडी ऑन स्क्रीन पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.