फोटो सौजन्य - JIO Cinema
बिग बॉस १८ : देशामध्ये प्रसिद्ध असलेला टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ ची क्रेझ सर्वत्र पसरली आहे. बिग बॉस १८ च्या घरामध्ये सध्या आता १५ सदस्य शिल्लक राहिले आहेत. कालच्या भागामध्ये बिग बॉसने नायरा बॅनर्जीला घराबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये १५ सदस्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. बिग बॉस तिसऱ्या आठवड्याचा काल रविवारचा विकेंडचा वॉर झाला. यामध्ये अनेक खेळाडूंना रिऍलिटी चेक देण्यात आले त्याचबरोबर अनेक टास्क देखील खेळवण्यात आले. बिग बॉसच्या घरामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये टाइम गॉड अरफिन खानला बनवण्यात आले होते. त्यानंतर मागील आठवड्यामध्ये घरामध्ये कोणीही टाइम गॉड नव्हते. टाइम गॉड म्हणजेच घरामधील कॅप्टन जो घरातील सदस्यांवर हक्क जमावेल आणि त्याला अनेक पॉवर सुद्धा देण्यात येणार आहेत.
हेदेखील वाचा – IND vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्ध पराभव! किवी संघाने मालिकेत केली बरोबरी
कालच्या भागानंतर एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चाहत पांडे आणि व्हिव्हियन डिसेना यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळत आहे. हे भांडण या दोघांमध्ये घरामध्ये पडलेल्या कपड्यामुळे झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांचे भांडण लक्षात ठेवून बिग बॉसने सर्व घरांमधील सदस्यांना गार्डनमध्ये बोलावून घेतले आणि सांगितले की आता घराचा नवा टाइम गॉड निवडण्याची आता वेळ आली आहे. त्यानंतर बिग बॉस व्हिव्हियनला प्रश्न करतात की या घरामध्ये सर्वात अस्वच्छ कोण आहे. यावर व्हिव्हियन उत्तर देतो की चाहत पांडे घरामधील सर्वात अस्वच्छ स्पर्धक आहे. यावर बिग बॉस म्हणतात की मग जर वर्गामधील सर्वात खोडकर मुलाला वर्गाचा मॉनिटर केला तर कस होईल. हे ऐकून घरातील सदस्यांना धक्का बसतो. आता आजच्या भागामध्ये होणार काय हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
Noww It Will Fun To seen How Chahat assign her duty 😂
Vivian Be Like – L lag Gaye 😂{#ChahatPandey • #BiggBoss18}
{#Rahat • #RajatDalal}pic.twitter.com/28B1QdAfQT— ᴹᵉᵈⁱᵗᵃᵗⁱᵒⁿ (@IMMeditation_) October 28, 2024
बिग बॉसच्या घरामध्ये काही गट पडले आहेत. यामध्ये पहिल्या गटामध्ये अविनाश मिश्रा, व्हिव्हियन डिसेना, एलिस कौशिक आणि ईशा सिंह यांचा एक ग्रुप आहे. तर दुसरा ग्रुप म्हणजेच करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, श्रुतिका अर्जुन आणि चुम नारंग या चौघांचा एक गट आहे. करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, श्रुतिका अर्जुन आणि चुम नारंग यांच्यामध्ये मैत्रीमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. करणवीर आणि श्रुतिका अर्जुन हे एकमेकांशी नाराज आहेत. त्यामुळे त्यांना दुःख होत आहे. त्यामुळे त्यांची आता त्यांची मैत्री टिकून राहणार की नाही हे पाहणं मनोरंजक ठरेल.
Waqt ke saath gharwaalon ko pataa chal raha hai kaun hai paraaya aur kaun apnaa. Kya Shrutika mitaa paayegi apne doston ke saath yeh daraar? 🧐
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par. @bellavita_org #Vaseline… pic.twitter.com/WjvskNBStD
— ColorsTV (@ColorsTV) October 27, 2024