फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका : भारताचा महिला संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध भारतामध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेचे दोन सामने झाले आहेत, यामध्ये पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या महिला संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता या तीन सामान्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. या सामन्याचा निकाल आता तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात लागणार आहे. त्यासाठी आता शेवटच्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो संघ मालिका नावावर करेल त्यामुळे शेवटच्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला संघाची एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना २९ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये काल तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेचा दुसरा सामना पार पडला. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत ९ विकेट्स गमावून २५९ धावा केल्या. यामध्ये भारताच्या महिला गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी दाखवली आणि फिल्डिंग सुद्धा मजबूत केली. परंतु न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने कमालीची कामगिरी करत संघासाठी ७९ धावा केल्या आणि भारताविरुद्ध मोठी धावसंख्या उभी केली.
New Zealand win the 2nd ODI by 76 runs.#TeamIndia will look to bounce back in the 3rd and final ODI to win the series
Scorecard ▶️ https://t.co/h9pG4I3zaQ#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/mpZutvte36
— BCCI Women (@BCCIWomen) October 27, 2024
भारताच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर संघाने राधा यादव अविश्वसनीय कामगिरी करत संघासाठी ४ विकेट्स घेतले. त्याचबरोबर तिने दोन झेल सुद्धा पकडले. दीप्ती शर्माने संघासाठी दोन विकेट्स नावावर केले. भारतीय संघासाठी पहिल्यांदाच खेळणारी प्रिया मिश्राने तिच्या डेब्यू सामन्यात एक विकेट घेतला. भारतीय फलंदाजांनी कालच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडच्या संघाने १८३ धावांवर सर्वबाद केले आणि भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
हेदेखील वाचा – IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्धचा पराभव BCCI च्या जिव्हारी; भारतीय संघाबबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकली तर ४.६ ओव्हरमध्ये भारताच्या संघाने तीन विकेट्स गमावले होते. यामध्ये स्मृती मानधनाने एकही धाव न करता स्वतःचा विकेट गमावला. शेफाली वर्माने संघासाठी फक्त ११ धावा केल्या. यास्तिका भाटियाने १२ धावा केल्या तर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघासाठी २४ धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिक्सने १७ धावा केल्या. तेजल हसबनीसने आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी संघासाठी १५ धावा केल्या. राधा यादव कालच्या सामन्यात संघासाठी ऑल राउंडर सारखी कामगिरी केली. तिने संघासाठी ४८ धावा केल्या आणि साईमा ठाकोरने संघासाठी २९ धावा केल्या.