Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद…‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ ठरला प्रतिष्ठेच्या ‘इफ्फी’चा मानकरी!

मराठी चित्रपट 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया मध्ये झळकणार आहे. या चित्रपमध्ये तगडे मराठी कलाकार काम करताना दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 14, 2024 | 05:51 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या ५५व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात ‘इफ्फी’मध्ये झळकण्याचा मान बहुचर्चित ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाला मिळाला आहे. महोत्सवात चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे. ही मराठी कलाकार आणि प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटामध्ये धमाकेदार कथा पाहायला मिळणार आहे.

राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अमोल गोळे यांनी छायांकन, रोहन रोहन यांनी संगीत, विनोद पाठक यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाच्या नावातूनच शोले या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं, पण चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, समीर धर्माधिकारी, आनंद इंगळे, श्रीरंग महाजन हे मराठी कलाकार झळकले आहेत.

हे देखील वाचा- रेमो डिसूझाने ठोठावला SC चा दरवाजा, जारी केली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शोले’ चित्रपट आता सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ अनोख्या पद्धतीने या चित्रपटाला सलाम करण्यासाठी सज्ज आहे. त्यात आता भारतीय चित्रपटजगतात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इफ्फीमध्ये चित्रपटाला गाला प्रीमियरचा मान मिळणं ही कौतुकाची गोष्ट ठरली आहे.

हे देखील वाचा- Kanguva: सुर्या की बॉबी देओल? ‘कंगुवा’ चित्रपटासाठी या अभिनेत्याने घेतली जास्त फीस!

नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर येत आहे.

Web Title: The movie hazaar vela sholay pahila manus became the winner of the prestigious iffy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 05:38 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.