
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रभासचा “द राजा साब” हा चित्रपट ९ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे, पण नंतर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून आलेल्या नकारात्मक पुनरावलोकनांमुळे आणि कमकुवत कथानकामुळे चित्रपटाला मोठा धक्का बसला आहे. आठवड्याच्या शेवटी त्याच्या कमाईत लक्षणीय घट देखील झालेली दिसून आली आहे. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांतच चित्रपटाने अनेक रेकॉर्डस् मोडले असल्याचे समोर आले आहे. “द राजा साब” ने कोणते रेकॉर्डस् मोडले आहेत जाणून घेऊयात.
“द राजा साब” ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई?
“द राजा साब” नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने तीन दिवसात अनेक रेकॉर्डस् मोडले आहेत. आता चित्रपटाने त्याच्या प्रिव्ह्यू शोमधून ₹९.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ₹५३.७५ कोटींची कमाई केली. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन ₹२६ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ₹१९.१ कोटी कमावले आहे. यासह, “द राजा साब” ची तीन दिवसांची एकूण कमाई ₹१०८ कोटींवर पोहोचली आहे.
‘द राजा साब’ ने तीन दिवसांत किती कमाई केली?
‘द राजा साब’च्या कमाईत आठवड्याच्या शेवटी घट झाली असली तरी, चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि अनेक विक्रमही मोडले आहेत. ‘द राजा साब’ने जगभरात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून दमदार सुरुवात केली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यासोबतच, प्रभास हा एकमेव भारतीय अभिनेता बनला आहे ज्याचे सहा चित्रपट पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करत आहेत. या यादीत पूर्वी समाविष्ट असलेले चित्रपट म्हणजे बाहुबली २: द कन्क्लुजन, साहो, आदिपुरुष, सालार: पार्ट १ – सीजफायर आणि कल्की २८९८ एडी हे आहेत.
‘द राजा साब’ हा २०२६ मध्ये भारतात आणि जगभरात १०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट आहे. ‘द राजा साब’ हा १०८ कोटी कमाई करून धुरंधरच्या पहिल्या आठवड्याच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. कोइमोईच्या मते चित्रपटाने १०६ कोटींची कमाई केली आहे. “द राजा साब” ने तीन दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आणि हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर “वॉर २” चा विक्रम मोडला.
“वॉर २” ने चार दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता, आणि आता या चित्रपटाचे रेकॉर्ड प्रभासने मोडला आहे. “द राजा साब” ने १५८ कोटींच्या कमाईसह अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अनेक प्रमुख तेलुगू चित्रपटांना मागे टाकले आहे, ज्यात बालकृष्णचा “अखंड २” या चित्रपटाचा देखील समावेश आहे. ज्याने बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.