(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हळूच येणाऱ्या प्रेमाने सोशल मीडियावर नाद खुळा केला आहे. हो, असं बोलण चुकीचं ठरणार नाही कारण तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहे. अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री अनुश्री माने ही जबरदस्त जोडी या रोमँटिक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. गाण्याची हवा झाल्यानंतर आता ही जोडी ‘बिग बॉस मराठी’ मध्येही झळकत आहे. एकमेकांच्या प्रेमात बेधुंद आलेल्या या प्रेमीयुगुलाची रोमँटिक झलक या गाण्याद्वारे पाहायला मिळाली आहे.
या गाण्याची खास बाजू म्हणजेच या गाण्याचं शूटिंग लोकेशन. या रोमॅंटिक गाण्याची दिग्दर्शिका ज्योत्स्ना सुचिता संजय पेठे यांनी जबाबदारी उत्तमरीत्या पेलवली आहे हे त्या गाण्यातून समोर आलंच आहे. मात्र त्यांनी निवडलेल्या लोकेशनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. तसेच या दोघांची जोडी देखील लोकांना आवडलेली दिसत आहे.
Mastiii 4 OTT Release: ‘मस्ती ४’ आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ! जाणून घ्या कुठे आणि कधी होणार रिलीज?
‘तुझ्या पिरमाचा नादखुळा’ हे गाणं ग्रामीण भागात शूट झालं असून शहापूर जवळील अघई तानसा लेक या गावात शूट झालं आहे. गाण्याच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणी पार करत ज्योत्स्ना पेठे यांनी दिग्दर्शनाची उत्तम अशी बाजू सांभाळली आहे. गाण्यातील दृश्य नयनरम्य असून अत्यंत अचूक रित्या हे गाणं टिपण्यात आले आणि दिग्दर्शित करण्यात आले आहे. हे गाणं प्रदर्शित होताच या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गाण्याबाबतचा अनुभव शेअर करताना निर्माती, दिग्दर्शिका ज्योत्स्ना म्हणाल्या, “तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ या गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहून खरंच खूप छान वाटतंय. दिग्दर्शिका आणि निर्माती अशा दोन्ही बाजू या गाण्यासाठी जेव्हा मी सांभाळत होते तेव्हा अनेक अडचणी आल्या पण त्यावर मात करत हा यशस्वी प्रयत्न पूर्ण झाला. कलाकार, संपूर्ण टीमची अर्थातच खूप मदत झाली प्रत्येक वेळी नव्याने काहीतरी शिकायला मिळालं आणि या गाण्याच्या चर्चेबरोबरच दिग्दर्शिका म्हणून माझ्या दिग्दर्शनाचही कौतुक होतंय हे खरंच मला भारावून टाकणार आहे”. असे त्या म्हणाल्या.
‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ हे गाण ज्योत्स्ना सुचिता संजय पेठे दिग्दर्शित असून निर्माती म्हणूनही त्यांनी या गाण्याची धुरा पेलवली आहे. हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळे या दोघांनी त्यांच्या सुमधूर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर राजेंद्र साळुंखे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल निखिल साठे लिखित आहेत. अल्पावधीतच युट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.






