(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
भारतीय दूरदर्शन आणि रंगभूमीच्या विश्वात अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि समाजजागृतीची मशाल पेटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रिया तेंडुलकर. प्रिया तेंडुलकर यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकताच आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने मराठी रंगभूमी, हिंदी दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र छाप पाडली
प्रियाचा अभिनय प्रवास मराठी रंगभूमीपासून सुरू झाला. त्यांनी आपल्या वडिलांच्या नाटकांमधून ‘गिधाडे’, ‘ती फुलराणी’ आणि ‘एक हट्टी मुलगी’ आपली ठसठशीत ओळख निर्माण केली. त्यांच्या दमदार संवादफेकीने आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.१९८० च्या दशकात प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, पण त्यांची खरी लोकप्रियता आली छोट्या पडद्यावरून.
अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांनी १९८५ साली प्रसारित झालेल्या “रजनी” या मालिकेत साकारलेला पात्र हा केवळ मनोरंजनासाठी नव्हता, तर तो सामान्य माणसाच्या वतीने भ्रष्टाचार, अन्याय आणि सरकारी यंत्रणेतील ढिसाळपणा याविरुद्ध उभी राहिलेली एक ठाम आणि प्रखर आवाज होती. त्या काळात दूरदर्शनवर अशा प्रकारचा थेट आणि प्रखर विषय हाताळणारा कार्यक्रम दुर्मिळ होता.
या मालिकेचा प्रभाव इतका जबरदस्त होता की प्रेक्षकांनी त्याला फक्त काल्पनिक गोष्ट न समजता वास्तवाशी जोडले. एकदा मालिकेच्या एका भागात टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांच्या वर्तणुकीवरील मुद्दा दाखवण्यात आला. या भागानंतर मुंबईतील काही टॅक्सी ड्रायव्हरांनी संताप व्यक्त केला आणि आंदोलन केलं. त्यांना वाटलं की मालिकेने संपूर्ण टॅक्सी व्यवसायाची बदनामी केली आहे.
KBC 17 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी कथित उध्दट वागणाऱ्या इशित भट्टची माफी,म्हणाला,‘’त्या क्षणी मी…”
विरोध म्हणून सुमारे ५०० हून अधिक टॅक्सी ड्रायव्हर्सनी मुंबईत टॅक्सी चालवणं थांबवलं. ते थेट दूरदर्शनच्या मुंबई कार्यालयात गेले आणि जोरदार निदर्शने केली. त्यांची मुख्य मागणी होती की मालिकेत त्यांच्या व्यवसायाचं चुकीचं चित्रण केल्याबद्दल सार्वजनिकपणे माफी मागितली जावी.
ही अनोखी घटना इतकी चर्चित झाली की ती राष्ट्रीय पातळीवर चर्चा का विषय बनली. सगळेच बोलत होते की एक टीव्ही सिरीयलने हजारो लोकांना रस्त्यावर कसे आणले. या घटनेला प्रसिद्ध अमूल जाहिरात नेही आपल्या होर्डिंगवर स्थान दिलं, ज्यामुळे हा किस्सा भारतीय पॉप कल्चरच्या इतिहासात अमर झाला.