Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND-SRI सामना बघता बघता मृत्यूनं घातला होता घाला! बॉलिवूडचा हा मराठमोळा अभिनेता तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूडचा हा मराठमोळा अभिनेता ज्याचा मृत्यू भारत वि. श्रीलंका सामना बघताना झाला होता.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 24, 2025 | 08:15 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

1996 चा वर्ल्ड कप सुरू होता… भारत विरुद्ध श्रीलंकेची मॅच सुरू होती. ही मॅच संपूर्ण देश बघत होता… अगदी सर्वसामान्यांपासून ते फिल्म स्टार्स सुद्धा! असाच एक फिल्म स्टार जो ही मॅच बघत होता, त्याला मॅच बघता बघताच हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यूही झाला! त्या अभिनेत्याचं नाव ‘शफी इनामदार’

शफी इनामदार कोण होते?
२३ ऑक्टोबर १९४५ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळच्या एका लहानशा गावात शफी इनामदारांचा जन्म झाला. त्यांनी आपली शाळा गावातच पूर्ण केली आणि नंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून सायन्समध्ये पदवी घेतली.लहानपणापासूनच शफी इनामदारांना अभिनयाची खूप आवड होती. ते शाळेतील नाटकांमध्ये कधी सहभागी व्हायचे तर कधी दिग्दर्शनही करायचे. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात गुजराती आणि मराठी रंगभूमीपासून केली आणि तब्बल ३० हून अधिक नाटकं लिहिली आणि दिग्दर्शित केली.

अभिनयासाठी लग्नाचं बंधन तोडलं, बॉलिवूडची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री 49 वर्षांच्या वयात जगतेय सिंगल लाइफ!

रंगमंचावरील कामामुळे ठरले अधिक प्रतिभाशाली
मूळचे महाराष्ट्रीयन असलेले शफी इनामदार यांनी केवळ अभिनेता म्हणून नाही तर लेखक दिग्दर्शक म्हणून सुद्धा कला जगतावर आपली स्वतःची छाप उमटवली! मूळचे रंगभूमीवरील कलाकार असल्याने त्यांना कला क्षेत्रातील कोणतंही काम कठीण नव्हतं. रंगमंचावर काम करताना त्यांना सामाजिक विषयांची अधिक जाण झाली आणि यामुळे ते एक संवेदनशील अभिनेता म्हणून आणखी प्रभावी ठरले

सिनेमात कारकीर्द:
शफी इनामदार यांनी १९८२ मध्ये गोविंद निहलानी दिग्दर्शित शशी कपूर यांच्या ‘विजेता’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि निहलानी यांनी त्यांची प्रतिभा लगेच ओळखली. १९८३ च्या हिट चित्रपट ‘अर्धसत्य’ मध्ये इन्स्पेक्टर हैदर अलीची भूमिका साकारल्याने त्यांना ओळख मिळाली. लवकरच ते केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर टेलिव्हिजनवरही एक परिचित चेहरा बनले. दूरदर्शनवरील १९८४ सालच्या ‘ये जो है जिंदगी’ त्यांच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरला, ज्यामुळे ते घराघरात लोकप्रिय झाला.

Marathi Movie: ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत,चाहत्यांनी दिला अनोखा सन्मान

शफी इनामदार नावारूपाला आले. पण, 1996 साली कोणाच्याही ध्यानी मनी नव्हतं ते घडलं… संपूर्ण देश वर्ल्ड कपमध्ये मग्न असताना शफी यांना मॅच बघता बघता हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अकाली मृत्यू झाला नसता तर, त्यांनी अभिनय क्षेत्रावरील आपला ठसा आणखी ठळक केला आता हे मात्र नक्की!

Web Title: This actor lost his life watching the cricket world cup was unable to bear the shock of indias defeat had a heart attack his name is shafi inamdar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Actor
  • bollywood movies
  • Bollywood News

संबंधित बातम्या

लूक्सवरून ऐकावे लागले टोमणे; Dhurandhar मधल्या अभिनेत्रने सांगितला बॉडीशेमिंगचा किस्सा म्हणाली….
1

लूक्सवरून ऐकावे लागले टोमणे; Dhurandhar मधल्या अभिनेत्रने सांगितला बॉडीशेमिंगचा किस्सा म्हणाली….

रणवीर सिंगच्या Dhurandhar ने खाल्लं मार्केट; 8 दिवसांत 200 कोटींचा गल्ला;  ‘रेड 2’ अन् ‘सिकंदर’ला टाकलं मागे
2

रणवीर सिंगच्या Dhurandhar ने खाल्लं मार्केट; 8 दिवसांत 200 कोटींचा गल्ला; ‘रेड 2’ अन् ‘सिकंदर’ला टाकलं मागे

सिनेसृष्टीला धक्का; राज्य सरकारचा पुरस्कार मिळवलेल्या ३० वर्षीय अभिनेत्याचे निधन, घरात आढळला मृतदेह
3

सिनेसृष्टीला धक्का; राज्य सरकारचा पुरस्कार मिळवलेल्या ३० वर्षीय अभिनेत्याचे निधन, घरात आढळला मृतदेह

५० वर्षांनंतर ‘शोले’चित्रपटाची जादू कायम, Dharmendra आणि Amitabh Bachchan च्या जय-वीरूला मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक भावूक
4

५० वर्षांनंतर ‘शोले’चित्रपटाची जादू कायम, Dharmendra आणि Amitabh Bachchan च्या जय-वीरूला मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.