Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेटफ्लिक्सवरील ‘IC814’ सिरीजमधील दहशतवाद्यांची नावे ‘हिंदू की मुस्लिम’? याबाबत मोठा खुलासा!

OTT वेब सिरीज IC 814: The Kandahar Hijack वरील वाद आणखी वाढल्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांना समन्स बजावले आहे. ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर २९ ऑगस्ट रोजी रिलीज झाली, ज्याची कथा कंदहार विमान अपहरणावर आधारित आहे. यामध्ये हिंदू नावांच्या वापरावरून संपूर्ण वाद निर्माण झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 02, 2024 | 05:07 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने Netflix (Netflix Summoned) ला समन्स जारी केले आहेत. कारण आहे नुकतीच प्रसिद्ध झालेली IC814: The Kandahar Hijack ही वेब सिरीज. पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह आणि विजय वर्मा या कलाकारांनी या मालिकेत काम केले आहे. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शन केले आहे. मोनिका शेरगिल ही नेटफ्लिक्स इंडियाची सामग्री प्रमुख आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मंत्रालयाने शेरगिल यांना या वेब सिरीजच्या कथित वादग्रस्त पैलूंवर उत्तर देण्यासाठी ३ सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. ही मालिका 1999 च्या कंदहार हायजॅकवर आधारित आहे. ज्या विमानाचे अपहरण करण्यात आले त्या विमानाचे पायलट कॅप्टन देवी शरण आणि पत्रकार श्रींजय चौधरी यांनी नंतर एक पुस्तक लिहिले. नाव- ‘फ्लाइट इन फियर: द कॅप्टन्स स्टोरी’. IC814 वेब सिरीज या पुस्तकातून प्रेरित आहे.

हिंदू नावांचा निषेध
इब्राहिम अथर, शाहिद अख्तर सईद, गुलशन इक्बाल, सनी अहमद काझी, मेकॅनिक जहूर इब्राहिम आणि शाकीर अशी विमान अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे आहेत. पण ते विमानात भोला, शंकर, डॉक्टर, बर्गर आणि चीफ असे कोड शब्द वापरून एकमेकांशी बोलत होते. सोशल मीडियावर लोकांनी भोला आणि शंकर या नावांवर आक्षेप घेतला आहे. अनुभव सिन्हा यांनी जाणूनबुजून हिंदू नावांचा वापर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Netflix कडून मागितले उत्तर
आता याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स कंटेंट हेडला उद्या बोलावले आहे. सरकारला या विषयावर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडून उत्तरे हवी आहेत. तथापि, जानेवारी 2000 च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अहवालानुसार, अपहरणकर्त्यांनी वापरलेले कोड शब्द त्याच मालिकेत दाखवले आहेत.

‘अमजद मियाँ यांचे नाव वारंवार पुढे येत होते’
पहिल्या एपिसोडच्या ४:१२ मिनिटांनी तीन दहशतवाद्यांमधील संभाषण दाखवण्यात आले आहे. भारतीय दूतावासाचे अधिकारी रामचंद्र यादव काही लोकांच्या खोल्यांमध्ये शांतपणे मायक्रोफोन लावतात. ते लोक पाकिस्तानचे होते आणि रामाला त्यांच्यावर संशय होता. त्यांच्यामध्ये रेकॉर्ड केलेल्या संभाषणात एक दहशतवादी त्याच्या साथीदाराचे खरे नाव घेतो. यामध्ये अमजद मियाँ नावाची व्यक्ती चीफ आणि डॉक्टर अशी सांकेतिक नावे असलेल्या व्यक्तींशी बोलत आहे. इथेही अमजदच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, तो विमानात उपस्थित असलेल्या अपहरणकर्त्यांपैकी नव्हता. पण संपूर्ण मालिकेत त्याची अनेकवेळा चर्चा होते. म्हणजेच या संपूर्ण घटनेमागील नियोजनात त्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

 

Netflix Content Head has been summoned tomorrow by the Ministry of Information & Broadcasting over the ‘IC814’ web series content row: Sources — ANI (@ANI) September 2, 2024

हे देखील वाचा-  सलमान खानला ‘सिकंदर’च्या शुटिंगदरम्यान झाली दुखापत, अभिनेता जिद्दीने पोहचला सेटवर! 

भाजप नेत्याने व्यक्त केला संताप
या प्रकरणी अनेक राजकारण्यांनी आपली भूमिका आधीच मांडली आहे. यावर बोलताना भाजपचे अमित मालवीय म्हणाले, “IC-814 चे अपहरणकर्ते भयंकर दहशतवादी होते ज्यांनी त्यांची मुस्लिम ओळख लपवण्यासाठी उपनाव धारण केले होते. चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा यांनी त्यांचे गैर-मुस्लिम नाव पुढे आणून त्यांचे गुन्हेगारी हेतू ठळक केले आहेत. कायदेशीर केले आहे.” असे म्हणून त्यानी आपला संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Union information and broadcasting ministry summoned netflix over terrorist name issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 05:07 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT platform

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.