Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virosh Reception: रश्मिका- विजयच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरु; मर्यादित आहे पाहुण्यांची लिस्ट, कडक पोलिस बंदोबस्त

अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित करणार असल्याचे समोर आले आहे. या समारंभापूर्वी त्यांच्या टीमने एक विशेष नोट देखील शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 02, 2026 | 08:38 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • रश्मिका- विजयच्या लग्नाच्या रिसेप्शनला सुरुवात
  • पाहुण्यांच्या यादीवर आणली मर्यादा
  • रिसेप्शनमध्ये कडक पोलीस बंदोबस्त
 

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नानंतर आता ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या त्यांच्या भव्य रिसेप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे. या ग्रँड रिसेप्शनबाबत एकामागोमाग एक अपडेट समोर येत आहेत. तसेच कधी स्थळाबाबत माहिती तर कधी पाहुण्यांची यादी लीक झाल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. या सगळ्या गडबडीत विजय आणि रश्मिकाने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ग्रँड रिसेप्शनबाबत लोकांना खास विनंती केली आहे. आता या दोघांनीही या पोस्टमध्ये काय लिहिले जाणून घेऊयात.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांनी नुकतेच लग्न केले असून, त्यांनी हैदराबादमध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. त्यांच्या टीमने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की ‘विरोश’ वेडिंग रिसेप्शन हे पूर्णपणे फक्त निमंत्रित पाहुण्यांसाठीच असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चाहत्यांनी आणि इतरांनी कार्यक्रमस्थळी येऊ नये, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”

विजय आणि रश्मिकाच्या लग्नाला देशभरातून भरभरून प्रेम मिळत आहे. छोटेखानी खासगी विवाह सोहळ्यानंतर आता ४ मार्चच्या संध्याकाळी हैदराबादमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. सुरुवातीला हा समारंभ तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील मान्यवर, तसेच काही मोठे राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नियोजित करण्यात आला होता.

मात्र देशभरातील प्रचंड उत्साह लक्षात घेऊन आणि पोलिस प्रशासनाशी चर्चा करून पाहुण्यांची यादी आणखी मर्यादित करण्यात आल्याचे समोर आले आहे. गर्दी होऊ नये, वाहतूक कोंडी टाळावी आणि सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पाहुणे, सर्वसामान्य नागरिक तसेच वधू-वरांची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची आहे.

‘Fighter’मुळे ओळख मिळालेला Rishabh Sahni, आता ‘Nagabandham’मध्ये दमदार खलनायक म्हणून झळकणार!

आवश्यकता भासल्यास पुढे अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित पद्धतीने आणखी एक रिसेप्शन आयोजित करण्याचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून इतर शुभेच्छुकांनाही सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश फक्त वैध निमंत्रणपत्र असलेल्या पाहुण्यांनाच दिला जाणार आहे. निमंत्रणाशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही.

दोघांचे कधी झाले लग्न?

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा विवाह २६ फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे पार पडला. या लग्नसोहळ्यात केवळ जवळचे नातेवाईक आणि चित्रपट इंडस्ट्रीमधील मोठमोठे कलाकार उपस्थित राहिले होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते देखील खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या फोटोवर भरभरून प्रतिसाद दिला.

Web Title: Virosh reception vijay rashmikas guest list may be shortened police will be on guard at every nook and corner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • entertainment
  • rashmika mandanna
  • vijay devarkonda

संबंधित बातम्या

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन
1

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा
2

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

‘रणबाली’च्या टीमने Vijay-Rashmika ला दिलं सरप्राईज, शूटिंग अपडेटमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता
3

‘रणबाली’च्या टीमने Vijay-Rashmika ला दिलं सरप्राईज, शूटिंग अपडेटमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं
4

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.