Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Who’s Your Gynac?’ सीझन 2चा ट्रेलर रिलीज; डॉ. विदुषीचा नवा संघर्षमय प्रवास पुन्हा भेटीला!

Amazon MX Player ने Who's Your Gynac? च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला असून २२ मेपासून ही मालिका मोफत पाहता येणार आहे. Saba Azad म्हणाली की, “विदुषीच्या भूमिकेत पुन्हा परतणे म्हणजे घरी परतल्यासारखे वाटले.”

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 19, 2026 | 06:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Amazon MX Player ने लोकप्रिय कॉमेडी-ड्रामा मालिका Who’s Your Gynac? च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हलक्याफुलक्या विनोदासोबतच आधुनिक स्त्रीजीवनातील भावनिक वास्तव मांडणाऱ्या या मालिकेने पहिल्या सीझनपासूनच प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता २२ मेपासून हा नवा सीझन मोफत स्ट्रीम होणार असून, पुन्हा एकदा डॉ. विदुषी कोठारीचा प्रेरणादायी आणि भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे.

Aarohi Season 24 : मुंबई होणार संगीतमय! उगवत्या सिताऱ्यांची मैफिल; ‘या’ तारखेला रंगणार संगीत सोहळा

The Viral Fever आणि गर्लियापा निर्मित या मालिकेत Saba Azad प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पहिल्या सीझननंतर तीन महिन्यांनी कथा पुढे सरकते. यावेळी विदुषीने स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र स्वतःचा व्यवसाय उभा करताना तिला आर्थिक ताण, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. या संघर्षांदरम्यान तिचे मित्र आणि रुग्ण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसतात.

या सीझनमध्ये Karishma Singh, Aaron Arjun Kaul, Kunal Thakur, Vibha Chibber आणि Shruti Seth यांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. मालिकेचे दिग्दर्शन Himali Shah यांनी केले आहे. Amogh Dusad यांनी सांगितले की, पहिल्या सीझनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच या कथेला पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली. “डॉ. विदुषीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील संघर्ष अधिक जवळून दाखवण्याचा प्रयत्न या सीझनमध्ये करण्यात आला आहे. मनोरंजनासोबतच प्रेक्षकांशी भावनिक नातं निर्माण करणाऱ्या कथा सादर करण्यावर आमचा भर आहे,” असे त्यांनी म्हटले.

Bandar Movie: अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’चा ट्रेलर रिलीजसाठी सज्ज; बॉबी देओल मुख्य भूमिकेत


आपल्या भूमिकेबद्दल बोलताना Saba Azad म्हणाली, “विदुषीच्या भूमिकेत पुन्हा परतणे म्हणजे घरी परतल्यासारखे वाटले. या सीझनमध्ये तिच्या मनातील शंका, चुका आणि बदल अत्यंत वास्तव पद्धतीने मांडले आहेत. त्यामुळे अनेकांना तिचा प्रवास स्वतःच्या आयुष्याशी जोडून घेता येईल.” दिग्दर्शिका Himali Shah यांनीही या सीझनमध्ये प्रत्येक पात्राच्या भावविश्वात अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. प्रत्येक पात्राचा वैयक्तिक प्रवास आणि बदल यावेळी अधिक जवळून अनुभवायला मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. Who’s Your Gynac? सीझन 2 हा २२ मेपासून केवळ Amazon MX Player वर मोफत उपलब्ध होणार आहे. मोबाईल, स्मार्ट टीव्ही, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओटीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीमसह विविध प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे.

Web Title: Whos your gynec season 2 trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • amazon
  • Amazon Prime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.